Latest

Maharashtra Guardian ministers | १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती, अजितदादा ठरले वरचढ, वाचा कोण कुठे?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली. यात उपमुख्यमंत्री अजितदादा वरचढ ठरले आहेत. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे अकोल्याची जबाबदारी दिली आहे. दिलीप वळसे-पाटील बुलढाण्याचे पालकमंत्री बनले आहेत. धनंजय मुंडे यांची त्यांच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra Guardian ministers)

संबंधित बातम्या 

अजित पवार गणेशोत्सवादरम्यान वर्षा बंगल्यावर गणरायाच्या दर्शनासाठी गेले नव्हते. त्यामु‍ळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहिले नव्हते. यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेला अधिक जोर मिळाला होता. याच दरम्यान, आज १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. त्यात अजित पवार गटातील आमदारांना झुकते माप देण्यात आल्याचे दिसते. (Maharashtra Guardian ministers)

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

पुणे – अजित पवार

अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील

अमरावती – चंद्रकांत दादा पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

भंडारा – विजयकुमार गावित

बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम

बीड – धनंजय मुंडे

परभणी – संजय बनसोडे

नंदूरबार – अनिल भा. पाटील

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT