Latest

विरोधी नेत्यांचे IPhone सरकार पुरस्कृत हॅकर्सच्या निशाण्यावर; Apple च्या इशाऱ्यानंतर गदारोळ

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि Iphone निर्माण करणारी कंपनी Appleने भारतातील काही नेत्यांचे Iphone सरकार पुरस्कृत हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचे म्हटले आहे. Apple ने संबंधित नेत्यांना यासंदर्भात अलर्ट पाठवला आहे.

तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, काँग्रेसचे नेते शशी थरुरु, आणि पवन खेरा, शिवसेना (ठाकरे) खासदार प्रियांका चर्तुवेदी या नेत्यांना हे अलर्ट मिळाले आहेत. या नेत्यांनी एक्सवर अलर्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. याशिवाय द वायर या वेबसाईटचे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनाही हे अलर्ट मिळाल्याचे द स्क्रोल या वेबसाईटने म्हटले आहे.

जर तुमच्या फोनच्या सुरक्षेची तडजोड झाली असेल, तर सायबर हल्लेखोर तुमच्या फोनमधील डेटा, तुमचे संवाद, कॅमेरा आणि मायक्रोफोन यावर नियंत्रण मिळवू शकतात, असे या अलर्टमध्ये म्हटले आहे. सरकार पुरस्कृत सायबर हल्लेखोरांकडे मोठ्या प्रमाणावर संसाधने असतात, तसेच हे हल्ले फार मर्यादित प्रमाणावर होत असल्याने त्यांचा माग काढणे कठीण असते असे अॅपलने म्हटले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT