Latest

Apple CEO Tim Cook : आर्थिक संकटात ‘टाळेबंदी’ हा कंपनीसमोरचा शेवटचा पर्याय-ॲपलचे सीईओ कुक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेतील अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आर्थिक महागाईचा सामना करत आहेत. यावर उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी कर्मचारी आणि पगार कपातीचा पर्याय अवलंबला आहे. दरम्यान Apple चे सीईओ टिम कुक यांनी टाळेबंदीवर मोठे विधान केले आहे. त्यांनी सध्या Apple ची कर्मचारी कपातीची कोणतीही योजना (Apple CEO Tim Cook) नसून, कोणत्याही कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार नाही, असे सांगितले आहे. तसेच आर्थिक संकटाच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी हा कंपनीसमोरचा शेवटचा उपाय असतो, असे कुक यांनी स्पष्ट केले आहे.

CNBC ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये कुक म्हणाले, बदलत्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्र मोठा संघर्ष करत आहे. कंपनीच्या बदलत्या मागण्या आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, गुगल, ॲमेझॉन, ट्विटर यांसारख्या मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून (Apple CEO Tim Cook) टाकत आहेत. मात्र आत्तापर्यंत Apple ही अशी एकमेव कंपनी आहे, जिने आत्तापर्यंत कोणतीही नोकरकपात केलेली नाही. यापुढे देखील लोकांना नोकरीवरून काढण्याची त्यांची कोणतीही योजना नाही, असे कुक यांनी स्पष्ट केले.

आर्थिक संकटातून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात टाळेबंदी (Apple CEO Tim Cook) हा शेवटचा उपाय अनेक कंपन्यांकडून वापरला जात आहे. अनेक दिग्गज कंपन्या खर्च कमी करण्यासाठी अशा प्रकारचे पाऊल उचलताना दिसत आहे. मात्र आम्ही नोकरकपात करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात नोकरभरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आर्थिक संकंटातून बाहेर पडण्यासाठी टाळेबंदीऐवजी बचत करण्याचे आणखी मार्ग शोधत असल्याचेही कुक यांनी सांगितले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT