Latest

स्टीव्ह जॉब्स यांनी वापरलेल्‍या Apple-1 Prototype चा लिलाव, जाणून घ्‍या कितीची लागली बाेली…

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरामध्ये ॲपल Apple कंपनीच्‍या प्रॉडक्ट्स  बद्दल लोकांमध्ये कायम उत्सुकता लागलेली असते. आता तर कंपनीचे संस्‍थापक स्टीव्ह जॉब्स यांनी  ४६ वर्षांपूर्वी वापरलेला Apple-1 Prototype करोडो रुपयांना विकला गेल्याने ॲपलबद्दलचे लोकांचे प्रेम पुन्‍हा एकदा अधोरेखित झाले आहे.

५.५ काेटी रुपयांची लागली बाेली

नुकताच ॲपलच्या Apple-1 Prototype चा लिलाव पूर्ण झाला. याला ५.५ करोड रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली. काही दिवसांपूर्वी १९७६ च्या ॲपलच्या कॉम्प्युटर सुद्धा असाच महागड्या किंमतीला विकला गेल्याचे वृत्त हाेते. स्टीव्ह जॉब्स यांनी माउंटन व्ह्यू कॅलिफोर्नियामधील बाइट शॉपचे मालक पॉल टेरेल यांना संगणकाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी या Prototypeचा वापर केला होता, त्यानंतर कंपनीला पहिली मोठी ऑर्डर आणि आणि तिचे भविष्यच बदललं.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT