पुढारी ऑनलाईन डेस्क : Apple iPod Discontinue : 'ॲपल'ने मोठा निर्णय घेत त्यांचे संगीत स्ट्रीमिंग डिव्हाइस iPod बंद केले आहे. कंपनीने वीस वर्षांपूर्वी संगीतप्रेमींसाठी हे डिव्हाइस बाजारात आणले होते. एक काळ असा होता की, iPod हे संगीत प्रेमींचे आवडते स्ट्रीमिंग गॅझेट बनले होते. आता हे गॅझेट पुरवठा सध्याचा स्टॉक असेपर्यंतच बाजारात उपलब्ध असेल. (Apple iPod Discontinue)
ॲपल कंपनीने iPod हे गॅजेट सर्वप्रथम 23 ऑक्टोबर 2001 रोजी बाजारात आणले होते. त्यानंतर कंपनीने या गॅझेटचे अनेक व्हर्जन बाजारात आणले. पण बाजारपेठेतील वाढती स्पर्धा आणि विशेषतः आयफोनसारख्या उपकरणांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याची चमक कमी झाली. कंपनीने 2019 च्या मध्यात 7व्या पिढीचा iPod Touch लाँच केला, पण या मालिकेतील व्हर्जन त्यानंतर अपडेट केले गेले नाही. ॲपलच्या अधिकृत वेबसाइटवर त्याची उपलब्धताही कमी झाली, कारण इतर उत्पादने, विशेषत: आयफोनने त्याची जागा घेतली. Apple Music कडे 90 दशलक्षाहून अधिक गाणी उपलब्ध आहेत. त्याच वेळी, iPod ची क्षमता 1 हजार ट्रॅक आहे.
Apple चे iPod हे संगीत प्रेमींसाठी एक उत्तम उपकरण बनले होते. यासोबतच कंपनी आपले लोकप्रिय पांढरे इयरफोनही देत असे. iPod चे नवीन मॉडेल लाँच होण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असायची. iPod त्याच्या 5GB स्टोरेज आणि फायरवायर कनेक्शनमुळे लोकप्रिय झाला, परंतु 2003 मध्ये Apple ने संगीत व्यवस्थापनासाठी iTunes अॅपची विंडोज आवृत्ती जाहीर केली जेणेकरून लाइनअप अधिक लोकप्रिय होईल आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. स्टीव्ह जॉब्सच्या काळात अॅपलला त्याची ब्रँड ओळख प्रस्थापित करण्यात मदत करण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरले. (Apple iPod Discontinue)
कंपनीने iPod Classic चे उत्पादन बंद केले आहे. ही क्लिक व्हील असलेली आवृत्ती होती, ज्यामध्ये एक छोटी स्क्रीन देण्यात आली होती. 2017 च्या सुरुवातीला, Apple ने त्यांचे सर्वात लहान म्युझिक गॅझेट iPod नॅनो आणि iPod शफल बनवणे बंद केले. वास्तविक, Apple iPod ची किंमत 19 हजारांपेक्षा जास्त आहे. तर आज बाजारात अनेक चांगले अँड्रॉइड स्मार्टफोन या किमतीत सहज उपलब्ध आहेत. ज्यामध्ये अनेक मेगापिक्सल्सपर्यंतचा कॅमेराही उपलब्ध आहे. मग केवळ गाणी ऐकण्यासाठी ग्राहक आयपॉडसारखे महागडे उपकरण का खरेदी करेल, असा प्रश्न आहे. याच कारणामुळे अखेर ॲपला iPod बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. (Apple iPod Discontinue)