Latest

Shubman Gill : ‘त्या’ निर्णयामुळे शुभमन गिलने शतकाला घातली गवसणी; शाकीबने पकडले डोके

अमृता चौगुले

चट्टोग्राम; पुढारी ऑनलाईन : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलने (Shubman Gill) आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. शतक झळकावल्यानंतर गिलने डोके झुकवून अभिवादन केले. गिलचे हे शतक अप्रतिम होते. गिलने १५२ चेंडूत ११० धावांची खेळी केली तर त्याचा साथिदार चेतेश्वर पुजाराने १३० चेंडूत १०२ धावांची खेळी केली. भारताने २ विकेटच्या मोबदल्यात २५८ धावांकरुन डाव घोषित केला. एकीकडे पुजारा आणि गिलने शतके ठोकत सामन्यात भारताची पकड मजबूत केली तर दुसरीकडे सामन्यात अशी घटना घडली जी पाहून सारेच अचंबित झाले.

भारताच्या दुसऱ्या डावाच्या 32 व्या षटकात, बांगलादेशकडे खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शुभमन गिलला (Shubman Gill) बाद करण्याची संधी आली होती. त्याचे असे झाले की, गोलंदाज यासिर अलीच्या चेंडूवर गिलच्या पॅडला चेंडू लागला आणि बांगलादेशच्या खेळाडुंनी अम्पायरकडे एलबीडब्ल्यू आऊट असल्याबाबत अपील केली. अम्पायरने ही अपील फेटाळून लावली. कर्णधार शकीब अल हसन पंचाचा निर्णयावर सहमत नव्हता, म्हणून त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर जे घडले ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते.

त्याचे असे झाले की जेव्हा शाकिबने अंपायरकडे डीआरएससाठी अपील केले तेव्हा नशीब गिलच्या (Shubman Gill) सोबत होते. वास्तविक, जेव्हा बांगलादेशी कर्णधाराला डीआरएस घ्यायचा होता, त्यावेळी डीआरएस पाहण्याच्या तंत्रज्ञानात बिघाड झाला होता. अशा स्थितीत त्यावेळी डीआरएस घेता आला नाही. तिसऱ्या पंचाने सांगितले की बॉल ट्रॅकिंग कॅमेराच खराब आहे आणि त्यामुळे मैदानावरील पंचाचा निर्णय वैध असेल.

अशा स्थितीत बांगलादेशी कर्णधार गिलविरुद्ध डीआरएस घेऊ शकला नाही, त्यामुळे शाकिबचा पारा गगनाला भिडला. पण तो काही करू शकला नाही. त्याचवेळी शुभमनचे नशीब त्याला शतकी खेळीपर्यंत घेऊन गेले. सोशल मीडियावर शाकिबचे चाहते संतापाच्या भरात बोलत आहेत.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT