Latest

Chandrababu Naidu : अटकपूर्व जामिन नाकारल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांची सुप्रीम कोर्टात धाव

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एपी फायबरनेट घोटाळा प्रकरणी आंध्र प्रदेश हायकोर्टाने अटकपूर्व जामिन नाकारल्यानंतर (Chandrababu Naidu) आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सुप्रीम कोर्ट धाव घेतली. (N Chandrababu Naidu)

संबंधित बातम्या – 

माजी मुख्यमंत्र्यांनी चंद्राबाबू नायडू यांनी फायबर नेट, अंगल्लू-३०७, इनर रिंग रोड या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पण आंध्र प्रदेश हायकोर्टाने नायडू यांचा जामीन अर्ज फेटाळला, अशी माहिती त्यांचे वकील कृष्णा मूर्ती यांनी दिली होती. आता नायडू यांनी सुप्रीम कोर्टाची पायरी चढली आहे.

तेलगू देसम पक्षाच्या नेत्यांनी आरोप फेटाळले

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख यांना गेल्या महिन्यात गुन्हेगारी अन्वेषण विभागाने (सीआयडी) कोट्यवधी रुपयांच्या कथित कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. ज्यामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. परंतु, अनेक तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) नेत्यांना चंद्राबाबूंवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत फेटाळून लावले होते.

SCROLL FOR NEXT