Latest

Anupam Kher : नदाव लॅपिड यांच्या ‘काश्मीर फाईल्स’ विधानावर अनुपम खेर यांचा पलटवार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या ज्युरी प्रमुखांनी 'द काश्मीर फाइल्स'चे वर्णन 'असभ्य आणि दुष्प्रचारक चित्रपट' असे केल्यानंतर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर फाईल्स (The Kashmir files) चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, इस्रायलचे चित्रपट निर्माते आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी हा दुष्प्रचार करणारा चित्रपट म्हटले आहे. या चित्रपटाचा निषेध करत त्यांनी याला असभ्य सुद्धा म्हटल होते. (International Film Festival) या प्रकारानंतर अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नादव लॅपिड यांच्यावर पलटवार केला आहे.

चित्रपट निर्माते अशोक पंडित, भारतातील इस्त्रायलचे राजदूत आणि मुंबईमध्ये इस्त्रायलचे महावाणिज्यदूत कोब्बी शोशानी यांनीदेखील लॅपिड यांच्या विधानावर आक्षेप घेतला. इफ्फीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लॅपिड चित्रपटाविषयी वादग्रस्त विधाने करताना दिसत आहेत. (Anupam Kher)

अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हटलं की, झूठ का कद कितना भी ऊंचा क्यों ना हो..सत्य के मुकाबले में हमेशा छोटा ही होता है.' या सोबतचं त्यांनी चित्रपटाचे काही फोटोदेखील ट्विट केले आहेत.

अशोक पंडित म्हणाले-

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीदेखील लॅपिड यांच्या विधानावर टीका केली, त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं, 'चित्रपट द कश्मीर फाईल्ससाठी लॅपिड यांच्याकडून वापरण्यात आलेल्या भाषेचा मी विरोध करतो. ३ लाख कश्मिरी हिंदूंचा नरसंहार दाखवणाऱ्या चित्रपटाला अश्लील म्हणू शकत नाही. एक चित्रपट निर्माता म्हणून आणि कश्मीरी पंडितच्या नात्याने मी याप्रकारच्या व्यवहारावर टीका करतो.'

काय म्हणाले होते लॅपिड?

ज्युरी म्हणाले की, हा चित्रपट पाहून आम्‍हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे पाहून आम्हाला वाटले की हा केवळ प्रसिद्धी स्टंट करणारा आणि असभ्य चित्रपट आहे. या प्रकारचे चित्रपट एखाद्या सुप्रसिद्ध चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक, स्पर्धात्मक प्रकारात शोभत नाहीत. (International Film Festival)

गोव्यात साजऱ्या होत असलेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बड्या कलाकारांनी सहभाग घेतला. पण, याच दरम्यान ज्युरी आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी विवेक अग्निहोत्रींच्या 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाबाबत दुष्प्रचारक करणारा म्हटल्यावर मात्र तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. खरं तर, या चित्रपटाबाबत विवेक अग्निहोत्रीचा दावा आहे की, 'द कश्मीर फाईल्स…' मधून त्यांनी काश्मिरी पंडितांची दुर्दशा दाखवली आहे. या चित्रपटाने थिएटरमध्येही चांगला व्यवसाय केल्याची माहिती आहे. पण इस्त्रायली चित्रपट निर्मात्याने याचे वर्णन असभ्य श्रेणीचा चित्रपट असे केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT