Latest

नवी दिल्ली : राजधानीत आढळला दुसरा ‘ओमायक्रॉन’चा रूग्ण

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा ; राजधानी दिल्लीत कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचा दुसरा रूग्ण आढळला आहे. देशातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या त्यामुळे ३३ वर पोहचलीय. झिम्बाब्वे आणि दक्षिण आफिक्रेतून प्रवास करून दिल्लीत आलेला हा रूग्ण ओमायक्रॉन व्हेरियंट बाधित असल्याचे तपासण्यांमधून निष्पन्न झाले आहे.

संबंधित रुग्णाला उपचारासाठी लोक नायक जयप्रकाश रूग्णालयात (एलएनजेपी) दाखल करण्यात आले आहे. रूग्णाला केवळ अशक्तपणा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्ण नुकताच झिम्बाब्वे वरून भारतात परतला होता. यापूर्वी त्यांने दक्षिण आफ्रिकेचा प्रवास केला होता, अशी देखील माहिती समोर आली आहे. संसर्गग्रस्तांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे.

एलएनजेपी रूग्णालयाला सरकारने ओमायक्रॉन व्हेरियंटग्रस्तांच्या उपचारासाठी समर्पित करण्यात आले आहे. यापूर्वी रविवारी तंजानिया वरून नवी दिल्ली त परतलेल्या एका ३७ वर्षीय इसम ओमायक्रॉन व्हेरियंटग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित व्यक्ती मुळचा रांची येथील निवासी असून तो तंजानिया वरून दोहा आणि येथून कतार एअरवेजने २ डिसेंबरला दिल्लीत आला होता. तंजानियाच्या पूर्वी तो एक आठवडा दक्षिण आफ्रिकेच्या जोहानसबर्गमध्ये राहिला होता. या रूग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली होती.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT