Latest

Raj Babbar : राज बब्बर काँग्रेसला उत्तर प्रदेशात तगडा हादरा देणार ?

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आधी काँग्रेसला ( congress ) एक मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. अभिनेता तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर ( Raj Babbar ) यांच्याकडून काँग्रेसला डोके दुखी ठरु शकणाऱ्या गोष्टी घडत आहेत. अशी चर्चा सुरु आहे की, राज बब्बर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात (Samajwadi Party) उत्तर प्रदेश निवडणुकीपुर्वी प्रवेश करु शकतात. राज बब्बर हे पूर्वाश्रमीचे समाजवादी पक्षाचे नेते आहेत.

राज बब्बर ( Raj Babbar ) यांनी अलिकडच्या काळात केलेले ट्वीट हे पक्षाच्या विचारापासून भिन्न असणारे आढळले आहेत. शिवाय त्यांनी याबाबत अधिक स्पष्टता सुद्धा पक्षाला दिली नाही. जेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद (Ghulam Nabi Azad) यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला, तेव्हा काँग्रेसमधील एका गटाचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh)यांनी यावर टीका केली. तर राज ब्बबर यांनी गुलाम नबी आझाद यांचे अभिनंदन केले.

राज बब्बर यांनी ट्वीट करत म्हणाले, की गुलाम नबी आझाद साहेब आपले अभिनंदन, आपण एका मोठ्या भावा प्रमाणे आहात तसेच आपले सार्वजनिक जीवन आणि गांधी विचारांवरील आपली निष्ठा प्रेरणादायक आहे. आपल्याला मिळालेला पद्मभूषण पुरस्काराचा बहुमान हा आपण देशासाठी पाच दशकांहून अधिककाळ केलेल्या सेवेचा योग्य सन्मान आहे.

जेव्हा काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबावर टीका करणारे २३ जी गटातील नेते गुलाम नबी आजाद यांचे अभिनंदन केल्यावरुन पक्षातून राज बब्बर यांच्यावर टीका करण्यात आली. याला उत्तर देताना राज बब्बर ट्वीट करत म्हणाले, पुरस्काराचे महत्त्व तेव्हा असत जेव्हा विरोधी पक्ष तुमच्या कार्याची दखल घेऊन तुमचा सन्मान करतो. आपल्या सत्तमध्ये लोक कोणतीही इच्छा पुर्ण करुन घेऊ शकतात. ते पुढे असेही म्हणाले की, पद्मभूषण पुरस्कारावर वाद घालण्याची कोणतीच आवश्यकता नाही.

एका काळी मोठे प्रसिद्ध असणारे अभिनेते राज बब्बर यांनी १९८० च्या अखेरीस जनता दलाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते समाजवादी पक्षात गेले. १९९९ आणि २००४ या काळात ते आग्रा येथून खासदार म्हणून निवडूण आले. पण, २००६ मध्ये त्यांना समाजवादी पक्षातून बाहेर काढण्यात आले. यानंतर दोन वर्षांनी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे त्यांनी २००९ मध्ये फिरोजाबाद येथून पोटनिवडणूक जिंकले होते. पण, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना पराभवचा सामना करावा लागला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT