Latest

दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान शरद पवार जिंदाबादच्या घोषणा

निलेश पोतदार

शिक्रापूर ; पुढारी वृत्तसेवा पाबळ (ता. शिरूर येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त तीन दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दुपारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे बैलगाडा घाटात आगमन झाले. या भागातील पाणी प्रश्नावर बोलत असताना असताना लोकांनी शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. वळसे पाटील यांनी यावेळी भाषणात दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे नाव घेतले. त्याचवेळी घाटात उपस्थित लोकांमधून शरद पवार जिंदाबाद घोषणा दिल्या गेल्या. मात्र, यावेळी वळसे पाटील यांनी अरे तुमचे जितके प्रेम शरद पवार साहेबांवर आहे. तितकेच प्रेम माझे शरद पवार साहेबांवर आहे, मी चाळीस वर्षे त्यांच्यासोबत राहिलेलो आहे, काही राजकीय प्रश्न असतात. त्याबाबत मला काही खुलासा करायचा नाही. राजकीय सभेत राजकीय बोलू. आता आपण पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत मार्ग कसा काढायचा पाहू म्हणत आपले भाषण संपवले.

राज्यात सुरु असलेल्या घडामोडीचे पडसाद पाबळच्या या बैलगाडा घाटात पहायला मिळाले. शिवसेनेनंतर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली असताना अनेक दिग्गज नेते शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात सामील झाले आहेत. यातच शरद पवार यांचे घनिष्ठ सहकारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील पवार यांची साथ सोडली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT