Latest

Ramesh Kadam : अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा : रमेश कदम यांची ८ वर्षांनंतर तुरूंगातून सुटका

अविनाश सुतार

 ठाणे: पुढारी वृत्तसेवा : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळात घोटाळा केल्याप्रकरणात अटकेत असलेले माजी आमदार रमेश कदम यांची  तुरुंगातून जामिनावर आज (दि. २०) सकाळी ११ वाजता  सुटका करण्यात आली. येत्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे कदम (Ramesh Kadam)  यांनी यावेळी सांगितले.

साठे आर्थिक विकास महामंडळातील 312 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरुंगात होते. गेल्या 8 वर्षापासून ते ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. जामीन मिळाल्यानंतर अखेर आज त्यांची सुटका झाली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. रमेश कदम तुरुंगातून बाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. ढोल ताश्यांच्या गजरात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे संपूर्ण तुरुंग परिसर दणाणून गेला होता. यावेळी तुरुंगाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Ramesh Kadam)

माजी आमदार रमेश कदम यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून आज जामिनावर सुटका झाली. साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे ते तब्बल 8 वर्ष तुरुंगात होते. आठ वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षेनंतर त्यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. रमेश कदम यांची आज सुटका होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळपासूनच त्यांच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर गर्दी केली होती. मुंबई, ठाणे, सोलापूर अशा विविध ठिकाणावरून मातंग समाजाचे कार्यकर्ते ठाणे मध्यवर्ती कारागृह बाहेर जमले होते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

रमेश कदम राष्ट्रवादीचे माजी आमदार होते. नंतर त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये तुरुंगात असताना अपक्ष उमेदवार म्हणून सोलापूर मोहोळ या मतदार संघातून निवडणूक लढवली होती. कदम यांच्यावर महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अनेक आरोप आहेत. अध्यक्षपदावर असताना त्यांनी हे घोटाळे केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते.

त्यांच्यावर सोलापूर, पुण्यासह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तब्बल 312 कोटी रुपयांचा हा कथित घोटाळा असल्याचे सागितले जात आहे. या प्रकरणी त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे ते आठ वर्ष तुरुंगात होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT