Congress Working Committee List: काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा; G-23 गटातील नेत्यांचीही वर्णी | पुढारी

Congress Working Committee List: काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा; G-23 गटातील नेत्यांचीही वर्णी

पुढारी ऑनलाईन डेस्क : या वर्षा अखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नवी टीम तयार केली आहे. काँग्रेसने नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे. यात माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह एकूण ३९ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. (Congress Working Committee List)

त्याचबरोबर काँग्रेसवर नाराज असलेले आनंद शर्मा आणि शशी थरूर यांच्यासह G-23 मधील अनेक नेत्यांनाही या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. या कार्यकारिणीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. काँग्रेसमधील ही सर्वात मोठी निर्णय घेणारी समिती आहे. या नव्या कार्यकारिणीत फारसा बदल करण्यात आलेला नाही. यादी जाहीर करण्यापूर्वी गेल्या अनेक महिन्यांपासून बैठकांचे सत्र सुरू होते. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या होत्या.

Congress Working Committee List : कार्यकारिणीत या नेत्यांचा समावेश

CWC मध्ये मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, ए. के. अँटनी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंग, चरणजीत सिंग चन्नी, आनंद शर्मा यांच्यासह एकूण 39 नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय 32 स्थायी निमंत्रित, 9 विशेष निमंत्रित, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि सेवादल अध्यक्षांनाही स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button