पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विटने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंर्षाचा तिढा अद्याप सुटला नसताना , "अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत" दमानिया यांच्य या ट्विटने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदाा भूकंप येणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे, आता राजकीय वर्तूळातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. (Anjali Damania)
राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केलं आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच बघू, आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची"
अंजली दमानिया यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडिय़ावर मिम्सचा पाऊस पडतं आहे. यापूर्वीही त्यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा २०१९ मधील पहाटे शफतेवेळचा फोटो शेअर करत म्हंटल आहे की, किळसवाण राजकारण, मी पुन्हा येईन.
हेही वाचा