पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील ख्यातनाम उद्याेगपती, 'महिंद्रा ॲण्ड महिंद्रा'चे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand mahindra) हे सोशल मीडियावर नेहमीच ॲटिव्ह असतात. विविध क्षेत्रात सर्वसामान्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी, हटके संशोधन याचे व्हिडीओ ते ट्विटरवर शेअर करत असतात. आज त्यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असतानाचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी 'हॅलो, आयझॅक न्यूटन…?' शी सूचक पोस्टही केली आहे. ( Anand Mahindra tweet on Virat Kohli )
बुधवार, १७ जानेवारी रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 मालिकेतील शेवटच्या सामना झाला. अत्यंत थरारक अशा झालेल्या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या. अखेर यामध्ये भारताने विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीचा क्षेत्ररक्षण करत असतानाचा अप्रतिम फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी एक मजेशीर पोस्टही शेअर केली आहे. ( Anand Mahindra tweet on Virat Kohli )
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसर्या टी-20 सामन्यात विराट कोहलीही शून्य वर बाद झाला. मात्र त्याने क्षेत्ररक्षणात कमाल केली. कोहलीने नजीबुल्ला झद्रानचा झेल घेतला आणि सीमारेषेवर उडी मारत पाच धावा वाचवल्या. कोहलीची हवेतली झेप अप्रतिम होती. सामन्यानंतर विराटच्या क्षेत्ररक्षणाची चर्चा झाली.
आनंद महिंद्रा यांनी एक अप्रतिम पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी विराटचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हॅलो, आयझॅक न्यूटन ? गुरुत्वाकर्षण विरोधी घटनेसाठी भौतिकशास्त्राचा नवीन नियम परिभाषित करण्यात तुम्ही आम्हाला मदत करू शकता का?' आनंद महिंद्राच्या या पोस्टवर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिलं आहे कीण विराट कोहलीने अकल्पनी क्षेत्ररक्षण केले आहे. दुसर्याने लिहिलं आहे की "न्यूटन, कोहलीला भेटा, जिथे भौतिकशास्त्राचे नियम कालबाह्य होतात आणि क्रिकेटचे नियम लागू होतात."
हेही वाचा :