Latest

Prithvi Shaw : पृथ्वी शॉच्या समस्यांमध्ये वाढ; सपना गिलकडून विनयभंगचा गुन्हा दाखल

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात सुरू असलेला वाद अद्याप संपलेला नाही. पृथ्वी शॉसोबत गैरवर्तन आणि कारवर हल्ला केल्याप्रकरणी सपना आणि तिच्या सहका-यांना अटक झाली होती. पण सोमवारी गिल आणि अन्य तीन आरोपींना जामीन मंजूर झाला. गिल आणि इतर आरोपींना १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोर्टातून जामीन मिळाला. जामिनावर बाहेर आल्यानंतर गिलने पृथ्वी शॉविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Prithvi Shaw)

सपना गिलने पृथ्वी शॉवर विनयभंगाचा आरोप केला आहे. पृथ्वी शॉ व्यतिरिक्त आशिष सुरेंद्र यादव, ब्रिजेश आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपनाच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना गिलने आयपीसीच्या कलम ३४, १२०बी, १४४, १४६, १४८, १४९, ३२३, ३२४, ३५१, ३५४, ५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Prithvi Shaw)

सेल्फीवरून झाला होता वाद

१४ फेब्रुवारी रोजी पृथ्वी शॉ आपल्या मित्रांसोबत मुंबईतील हॉटेलमध्ये गेला होता. त्यानंतर सेल्फी काढण्यासाठी जमलेल्या सपनाच्या इतर मित्रांना त्याने आपल्याला इथे मित्रांसोबत वेळ घालवायचा आहे. असे सांगूत त्याने सेल्फी काढण्यासाठी नकार दिला. यावरून पृथ्वी आणि सपना यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर काही वेळाने हाणामारीत झाले. यावेळी सपनाच्या मित्रांनी पृथ्वी हॉटेलमधून परत जाताना त्याच्या कारवर बेसबॉल बॅटच्या सहाय्याने हल्ला केला होता.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT