पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील विजापूर पाठोपाठ गुजरातमधील कच्छ देखील भूकंपाने हादरले आहे. कच्छ येथे आज सकाळी ९ वाजता ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने दिली आहे. (Kachchh Earthquake) कच्छमध्ये झालेला भूकंप २० किमी खोलीवर झाला आहे.
याआधी आज सकाळी कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ६:५२ वाजता या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यासोबतच तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात आज सकाळी ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले.
भूकंप का होतात?
तज्ज्ञांच्या मते, भूकंपाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे टेक्टोनिक प्लेट्सच्या स्थितीत बदल होणे. पृथ्वीवर १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरतात आणि दरवर्षी ४ ते ५ मिमीने त्यांच्या ठिकाणाहून सरकतात. अशा स्थितीत एक प्लेट दुसऱ्यापासून दूर जाते आणि दुसरी प्लेट दुसऱ्याच्या खाली सरकते. या प्रक्रियेदरम्यान, या प्लेट्स एकमेकांना धडकल्यामुळे भूकंप होतो. (Earthquake)
हे ही वाचा :