Latest

Amritpal Singh Update: अमृतपाल सिंगला आश्रय दिल्याप्रकरणी पटिलायामधून महिलेला अटक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' चा प्रमुख अमृतपाल सिंग गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. दरम्यान, अमृतपाल सिंगला आपल्या घरात सहा तास आश्रय दिल्याच्‍या आरोपाखाली पटियाला येथील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्‍या गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली.

पंजाब पोलिसांनी फरार खलिस्तानी अमृतपाल सिंग याच्या पायाचे ठसे शोधून काढत त्याला सहानुभूती देणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. बलबीर कौर असे तिचे नाव आहे. ही महिला पटियालामधील सरहिंद रोडवरील हरगोबिंद नगरमध्ये राहते. हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शाहाबाद येथे जाण्यापूर्वी  अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांनी १९ मार्चला  बलबीर कौरच्‍या घरात सुमारे सहा तास आश्रय घेतल्याचा पोलिसांचा संशय आहे.

अमृतपाल सिंग पंजाबमधून पसार झाल्‍याचा संशय आहे. त्यामुळे शेजारील राज्यांमध्‍ये अलर्ट जारी करण्‍यात आला आहे. अमृतपाल सिंगने पंजाबमध्ये विविध वाहने बदलल्यानंतर मोटरसायकलवरून पळ काढल्‍याचा संशय आहे. या काळात त्याने कपडे, पगडीही बदलली असून दाढी कपड्याने झाकली असल्याचे फोटो सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 100 हून अधिक जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT