Latest

अमृतपाल सिंग पंजाबमधून पसार! पोलिसांच्या शोधमोहिमेला वेग

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क :  'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख, फरारी आरोपी अमृतपाल सिंग याचा पंजाब पोलीस शोध घेत आहेत. तो पंजाबमधून पसार झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. सोमवारी (दि.२०) अमृतपालचे कपडे आणि कार सापडल्यानंतर त्याने राज्याच्या सीमा ओलांडल्या असाव्यात, असा संशय पंजाब पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिस ठाण्यावरील हल्लाप्रकरणी आतापर्यंत ११४ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमृतपालचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय' लागेबांधे समोर आले आहेत. बंदी घातलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल या खलिस्तानी संघटनेचा हैंडलर असल्याचेही उघड झाले आहे.

दुचाकीवरुन पसार झाल्‍याचा संशय

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी अमृतपाल सिंग याची एक कार सापडली. कारबदलून त्‍याने शाहकोटला पलायन केले.  तेथून तो कपडे बदलून सहकाऱ्याच्या मोटारसायकलवरून पंजाबमधून पळून गेला असावा, असा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. गुप्तचर अहवालानुसार, अमृतपाल सिंग ड्रग रिहॅब सेंटर आणि गुरुद्वाराचा वापर करून शस्त्रास्त्रांचा साठा करत होता, तरुणांची दिशाभूल करुन त्‍यांनाआत्मघातकी हल्ले करण्यासाठी तयार करत होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT