Latest

अमृता फडणवीस यांचे सूचक ट्विट ‘रिकाम्या जागा भरा…’

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस  (Amruta Fadnavis) या कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमी चर्चेत असतात. कधी आपल्या गाण्यांनी तर कधी राजकीय नेत्यांवरील टीकेमुळे. आज त्या पुन्हा एकदा (Amruta Fadnavis tweet) चर्चेत आल्या आहेत निमित्त आहे त्‍यांनी केलेल्‍या सूचक ट्विटचे.

अमृता फडणवीस यांनी काय केले ट्विट? 

अमृता फडणवीस  (Amruta Fadnavis) या नेहमी चर्चेत असतात. तेवढ्याच त्या सोशल मीडियावर सक्रीय असतात. आज त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आपल्या  ट्विटरवर एक  ट्विट केले आहे. हे ट्विट हिंदी भाषेत केले आहे. यामध्ये लिहले आहे की, "रिकाम्या जागा भरा; आज मी____________ १. कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे, २. एक दु:खी प्रेम गीत लिहित आहे, ३.पावसापूर्वी #मुंबईचे रस्ते मी परिक्षण करण्याचा विचार करत आहे… आणि जो कोणी या प्रश्नांची बरोबर उत्तर देईल त्याला मिळेल लाईक

" आणि या ट्विटमध्ये #mondaythoughts #MondayVibes #MondayMotivaton हे हॅशटॅग बरोबर आपला एक फोटोही ट्विट केला आहे.

देवेंद्र फडणवीस साहेब यांची काळजी घ्या…

त्यांच्या या ट्विटला ट्विटर युझर्सनी भन्नाट रिप्लाय दिला आहे. नुकतेच देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याला अनुसरुन एक युझर म्हणत आहे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची काळजी घ्या. त्यांना लवकर बरे करा आणि पुन्हा बाहेर पडून द्या. तर एकाने म्‍हटलं आहे की, गाणं सोडून काय पण करा.

पाहा व्हिडीओ : ऊर्जेची गरज असते तेव्हा शिवतांडव स्तोत्र म्हणते :अमृता फडणवीस |Shivtandav stotra | Amruta Fadanvis

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT