पुढारी ऑनलाईन डेस्क
दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना कोरोनाची लागण झालीय. ते सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ३० जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पालेकर यांना कोविड-१९ ची लक्षणे होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. रुग्णालयात दाखल करतेवेळी पालेकर यांची प्रकृती नाजूक होती. सुरुवातीला त्यांना व्हेंटिलेटरवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्य़ात आलं होतं.
सूत्रांच्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अभिनेते पालेकर यांची तब्येतीत पहिल्यापेक्षा ठिक आणि स्थिर आहे. व्हेंटिलेटर काढून त्यांना आता सामान्य रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.
संध्या गोखले म्हणाल्या, पालेकर यांची प्रकृतीची चिंता करण्यासारखी कुठलीही बाब नाही. आता ते ठिक होत आहेत.