नाशिक मनपा निवडणूक : शिवसेना, राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवारांच्या याद्या

नाशिक मनपा निवडणूक : शिवसेना, राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवारांच्या याद्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आघाडी गृहीत धरून आघाडीच्या संभाव्य उमेदवारांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू केले असून, अनेक उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे आघाडी झाल्यास कुणाला तिकीट मिळणार याचा शोधाशोध इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहे.

दि. 2 मार्चपर्यंत प्रारूप प्रभागरचनांच्या आराखड्यावरील हरकती व सूचनांवर सुनावणी होणार आहे. त्यानंतर प्रभागरचना अंतिम होऊन मार्चच्या दुसर्‍या आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे तेथून पुढे निवडणुकीसाठी 45 दिवसांचा कालावधी धरल्यास एप्रिलअखेर अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते. तर दुसरीकडे दहावी आणि बारावी परीक्षेनंतरच निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक एक ते दीड महिना लांबणीवर पडणार असली तरी प्रभागरचनेमुळे निवडणुकीला सामोरे जावेच लागणार यावर शिक्कामोर्तब झाल्याने राजकीय पक्ष आणि त्यांच्या विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. अनेकांनी निवडणुकीचे बाशिंग बांधूनच प्रचारही सुरू केला आहे.

निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आघाडी होण्याची शक्यता गृहीत धरून दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी संभाव्य उमेदवारांची कच्ची यादीदेखील तयार केली आहे. त्यावर पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतीलच, परंतु पदाधिकार्‍यांकडून कुणाच्या नावाला कौल देण्यात आला आहे याची उमेदवारांकडून माहिती घेण्यासाठी पदाधिकार्‍यांची मनधरणी केली जात आहे.

बलस्थानांवर आधारित जागा वाटप
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 6 तर शिवसेनाला 35 जागांवर विजय मिळाला आहे. यामुळे आघाडी झालीच तर शिवसेनेकडून नव्या प्रभागरचनेनुसार 133 जागांपैकी 80 ते 85 जागांची मागणी होऊ शकते. तर राष्ट्रवादीला 45 ते 50 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. प्रत्येक पक्षाचे बलस्थान आणि स्टँडिंग उमेदवार गृहीत धरूनच जागांची निवड व मागणी केली जाणार आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news