Latest

TamilNadu Ammonia gas leak : एन्नौर अमोनिया गॅस लीक, नऊ जण रुग्णालयात दाखल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूच्या एन्नौरमध्ये अमोनिया गॅस लीक झाल्याचे समोर आले आहे. (Tamil Nadu Ammonia gas leak ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सब सी पाईप एन्नौर येथून गॅस लीक झाल्याने आसपास तीव्र वास सुटला. ज्यामुळे नऊ जणांना अस्वस्थ वाटू लागले. (Tamil Nadu Ammonia gas leak ) अवाडीचे संयुक्त आयुक्त विजयकुमार यांनी सांगितले की, घाबरण्याचे काही कारण नाही. सध्या प्रकृती स्थिर आहे. एन्नौरमध्ये आता कोणताही गॅस लीक झाला नाही. ते म्हणाले की, लोक परत घरी आले आहेत. घटनास्थळी शोधपथक, पोलिस पोहोचले आहेत.

संबंधित बातम्या –

अमोनिया गॅस लीक झाल्यानंतर भोपाळची दुर्घटना ताजी झाली. भारताच्या मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात ३ डिसेंबर १९८४ रोजी एक भयानक औद्योगिक दुर्घटना झाली. त्याला भोपाळ दुर्घटना म्हटले जाते. भोपाळ स्थित युनियन कार्बाईड नावाच्या कंपनी कारखान्यातून एका विषारी गॅस लीक झाले होते. जवळपास दीड हजारहून अधिक लोकांचा जीव गेला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT