Latest

Amitabh Bachchan : बिग बींचा मुंबईच्या पॉश भागात नवा आशियाना

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमिताभ बच्चन आपल्या अभिनयासाठी नव्हे तर कार कलेक्शन आणि त्यांच्या बंगल्यांसाठीदेखील प्रसिध्द आहेत. कदाचित ते बॉलीवूडचे असे एकमेव स्टार आहेत, त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी प्रसिध्द ठरल्या आहेत. अमिताभ बच्चन केबीसीमुळे तर लोकप्रिय आहेतच शिवाय, ते आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक नवा आशियाना खरेदी केला आहे, जो १२ हजार स्कवेअर फूट आहे. मुंबईतील पॉश भागात हे घर आहे. गुंतवणूक म्हणून त्यांनी ही प्रॉपर्टी खरेदी केल्याचे म्हटले जाते.

बॉलीवूडचा मेगा स्टार अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही ते चित्रपटात काम करताहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील फोर बंगलो एरियामधील पार्थेनॉन बिल्डिंगमध्ये ३१ व्या मजल्यावर हे आलीशान घर खरेदी केलं आहे. हे घर १२ हजार स्केअर फूट आहे. एका फ्लोरवर केवळ ४.५ bhk अपार्टमेंट आहे. कारपेट एरिया ३३७८ स्केअर फूट आहे.

अमिताभ यांच्या नावावर अनेक बंगले

अमिताभ बच्चन सध्या ज्या बंगल्यात आपल्या परिवारासोबत राहतात, त्या बंगल्याचे जलसा आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रतीक्षा नावाचा आणखी एक बंगला आहे. २०२१ मध्येदेखील त्यांनी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. ३१ कोटींचे घर घेऊन ते चर्चेत आले होते. हे घर त्यांनी २०२० मध्ये खरेदी केलं होतं. पण, रजिस्ट्रेशन २०२१ मध्ये केले होते.

अमिताभ यांनी नव्या घरासाठी ६२ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. अमिताभ यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती आहे. अमिताभ अनेकदा मालमत्ता खरेदीसाठी पैसे गुंतवत असतात. २०१३ मध्ये देखील त्यांनी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी जुहू येथील त्यांच्या 'जलसा' बंगल्याच्या मागे असलेला दुसरा बंगला विकत घेतला, ज्याची किंमत ५० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT