Latest

मुंबई : अमिताभ बच्चन आणि अनुष्‍काला विनाहेल्‍मेट दुचाकीवरून प्रवास पडणार महागात, पोलिसांकडून होणार कारवाई

निलेश पोतदार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा दुचाकीवर मागच्या सीटवर बसताना हेल्मेट न घातल्याने अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यावर मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अमिताभ बच्चन यांना सोमवारी दुपारी सेटवर पोहोचायचे होते. परंतु त्यांची कार वाहतूक कोंडीत अडकली. त्यानंतर त्यांनी सेटवर जाण्यासाठी एका अनोळखी दुचाकीस्वाराची मदत घेतली. याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. तसेच अनोळखी दुचाकीस्वाराचे आभार व्यक्त केले.

तर दुसरीकडे अनुष्का शर्मा हीदेखील वाहतूक कोंडीत अडकली होती. त्यानंतर तिने बॉडीगार्डच्या दुचाकीवरून सेट गाठला होता.
दुचाकीवर बसताना दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे कायद्याप्रमाणे दोघांवर कारवाई केली जाईल असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT