पुढारी ऑनलाईन ; अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन दोन दिवसांनी भारतातील जी-२० शिखर सम्मेलना मध्ये सामील होणार होते. या आधी दोघांचा कोरोना रिपोर्ट आला आहे. यामध्ये फर्स्ट लेडी जिल बायडेन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मात्र फर्स्ट लेडीच्या कार्यालयाच्या म्हणण्यानुसार लेडी बायडेन यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. दरम्यान त्या डेलावेयर स्थित आपल्या निवासस्थानीच राहतील. त्यांच्या कम्युनिकेशन डायरेक्टरने दिलेल्या माहितीनुसार व्हाईट हाउस मेडिकल यूनिटने जवळच्या लोकांना याची माहिती दिली.
७१ वर्षीय जिल बायडेन पहिल्यावेळी १६ ऑगस्ट रोजी साउथ कॅरोलिना मध्ये राष्ट्रपतींसोबत सुट्ट्यांच्या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्या ५ दिवसांपर्यंत क्वारंटाईनमध्ये राहिल्या होत्या.
७ सप्टेंबरला भारतात येणार होत्या फर्स्ट लेडी
राष्ट्रपती बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन जी-२० शिखर सम्मेलनात सामील होण्यासाठी 7 सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार होते. राष्ट्राध्यक्ष बिडेन ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील, असे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. G-20 च्या नेतृत्वाबद्दल ते मोदींचे कौतुक करतील. याशिवाय, ते 9-10 सप्टेंबर रोजी G-20 परिषदेत सहभागी होतील, जिथे ते इतर G-20 भागीदारांसोबत स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलासारख्या अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील.
व्हाईट हाऊसने सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या युक्रेनमधील युद्धाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जागतिक बँकेसह बहुपक्षीय विकास बँकांची क्षमता वाढविण्यावर चर्चा होईल जेणेकरून गरिबीशी योग्य पद्धतीने लढा देता येईल.
हेही वाचा :