Latest

Navaratri 2022 : अमरावतीचे जागृत दैवत-अंबादेवी; देवी रुक्मिणी अंबादेवी मंदिरात आली अन्… जाणून घ्या पौराणिक कथा

सोनाली जाधव
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील प्राचीन नगरी असलेल्या उदुंबरावती नावाने ओळख असलेले अमरावती शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून उदयास आली. उंबराचे दाट जंगल असल्याने या गावाचे नाव उदुंबरावती पडले. नंतर तयाचे सरळ रुप उंबरावती, उमरावती आणि आता अमरावती असे झाले आहे. पौराणिक काळात अमरावती शहराचे विशेष महत्व राहिले आहे. येथे असलेली श्री अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अंबा देवी (Ambadevi Navratri 2022) आणि एकवीरा देवीच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी होत आहे. श्री जनार्दन स्वामी, श्री नारायण गुरु महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, संत मृगेंद्र शंकर स्वामी अशा संतांच्या पवित्र चरणांमुळे अमरावतीची प्रसिद्धी वाढली.

भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे येथूनच केले हरण

उमरावती जवळ कुंडीणपूर हे यदू वंशाचे राजा भीष्मक यांची राजधानी होती. देवी रुक्मिणी ही भीष्मक राजाची मुलगी होती. रुक्मिणीने श्रीकृष्णासोबत विवाह करण्याचा निश्चय केला होता. मात्र, तिच्या भावाने शिशूपाल सोबत रुक्मिणीचा विवाह निश्चित केला होता. त्यामुळे रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहीत श्री अंबादेवी मंदिरातून हरण करण्यास सांगितले होते. अमरावतीच्या गौरवशाली इतिहासात याचा उल्लेख आहे. देवी रुक्मिणी विवाहापूर्वी अंबादेवी मंदिरात दर्शनाकरिता आली त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अंबादेवी मंदिराच्या बाहेरून रुक्मिणीचे हरण केले. पौराणिक कथेत याचा उल्लेख आढळून येतो. तेराव्या शतकात श्री गोविंद प्रभू अमरावती आले असता त्यांनी रुक्मिणी हरणाचे स्थान पाहिल्याचा उल्लेख आहे. अश्या प्रकारे पौराणिक काळापासून श्री अंबादेवी मंदिराचे अस्तित्व असल्याचे दिसून येते.

Ambadevi Navratri 2022 : पाच हजार वर्षांपूर्वीची मूर्ती

पुरातत्व विभागानुसार श्री अंबादेवीची मूर्ती पाच हजार वर्ष जुनी आहे. बेसाल्ट दगडापासून निर्मित मूर्ती स्वयंभू आहे. मूर्तीचे दोन्ही हात कमरेवर टेकवलले आहे. पद्मासनात बसून शांत, गंभीर, ध्यान, चैतन्य मूर्ती आहे. दिवसातून अनेकदा मूर्ती रुप आणि भाव बदलते. पूर्णपणे अलंकृत असताना महिषापूराचा वध करणाऱ्या चंडिकेच्या रुपात देखील दिसून येते. शक्तीपीठ अत्यंत पवित्र असून विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबादेवीला अग्रपूजेचा सन्मान प्राप्त आहे.
दक्षिणात्य मूर्तीकलेची छाप
श्री अंबादेवीचे मूळ मंदिर प्राचीन आहे. श्री अंबादेवीच्या मूर्तीला 19 व्या शतकाच्या पूर्वाधात एका छोट्या हेमाडपंथी मंदिरात स्थापीत करण्यात आले. जुने मंदिर कायम ठेवत समोर एक भव्य मंदिर निर्माण करण्यात आले. त्यामुळे मंदिराच्या आत एक मंदिराचे निर्माण केल्याचे दिसून येते. श्री अंबादेवी मंदिराच्या निर्माण कार्यात दक्षिणात्य मूर्तीकलेची छाप आहे. अंबादेवी आणि महादेव मंदिराच्या शिखराचे निर्माण 1896 मध्ये करण्यात आले. मंदिरावर असलेल्या तांब्याच्या कळसला 1906 मध्ये सोन्याचे पॉलिश करीत चढविण्यात आला. अंबामाता मंदिरात बाजूला श्री गणपती आणि हरिहर यांचे मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या उत्तरकडे श्री हनुमान मंदिर आणि सोबत दुर्गामाता मंदिर आहे. मंदिराचे सभागृहाचे छत काचाच्या कलाकृती पासून बनविण्यात आले आहे. नवरात्री दरम्यान भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून अंबादेवी मंदिरात आतून काही बदल करण्यात आले. मात्र, जुने मंदिर जसेच्या तसे आहे.
हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT