Latest

Engineers Day : लातूरच्या भूकंपापेक्षा जास्त मोठा आघात सहन करू शकणारा आश्चर्यकारक पूल! भारतीय अभियंत्यांची कमाल…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Engineers Day  भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचा अजोड नमुना म्हणजे 'चिनाब रेल्वे ब्रिज'. पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा उंच असलेला हा पूल आत्मनिर्भर भारताचे प्रतिक देखिल आहे. तसेच हा पूल कोकण रेल्वे आणि उत्तर रेल्वे यांच्या कल्पक बुद्धिचातुर्याची ओळख करून देतो.

Engineers Day  हा पूल 1315 मीटर लांब आहे. हा पूल बांधण्यासाठी तब्बल 55 हजार मेट्रिक टन स्टीलचा उपयोग करण्यात आला. यामध्ये 30,350 मेट्रिक टन ब्रीजच्या बांधकामासाठी 10620 मेट्रिक टन आर्चच्या बांधकामासाठी आणि 14 हजार 504 मेट्रिक टन स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला. हा रेल्वे पूल 40 किलोग्रॅम टीएनटी स्फोटकांचा स्फोट किंवा 8 रिश्टर स्केलची तीव्रता असलेल्या भूकंपाचा धक्काही सहन करू शकतो. म्हणजेच 1993 मध्ये झालेल्या लातूरच्या भूकंपापेक्षाही जास्त मोठा आघात हा पूल सहन करू शकतो. विशेष म्हणजे स्फोटानंतरही या पुलावरून ताशी 30 किलोमीटर वेगाने रेल्वे जाऊ शकते.

Engineers Day  हा पूल 1,315 किलोमीटर लांबीचा असून तो ताशी 260 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वार्‍याचा आघात सहन करू शकतो. या पुलावर एक फुटपाथ आणि एक सायकल मार्गही बनवण्यात आला आहे. हा रेल्वे पूल बारामुल्लास उधमपूर-कटरा-काजीगुंडमार्गे जम्मूला जोडणारा आहे. या पुलाची लांबी 1315 मीटर आहे. त्यामध्ये 467 मीटरचा मेन आर्क स्पेस आहे.

हा आतापर्यंत बनवलेल्या कोणत्याही ब्रॉड गेज लाईनवरील सर्वाधिक लांबीचा आर्क स्पॅन आहे. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवर (324 मीटर) पेक्षा 35 मीटर उंच आणि कुतुब मीनारपेक्षा सुमारे पाच पट अधिक उंचीचा आहे.

हे ही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT