Latest

Good News ! यंदा ’अल निनो’ सक्रिय, तरी पाऊस चांगला पडणार

अमृता चौगुले

आशिष देशमुख :

पुणे : यंदा 'अल निनो' जून ते सप्टेंबरपर्यंत सक्रिय राहणार असला, तरीही भारतीय समुद्री स्थिरांकासारखे इतर काही घटक मान्सूनला अनुकूल असल्याने यंदा तो चांगला बरसणार आहे, असा दावा भारतीय हवामान विभागाने केला आहे. आजवरच्या 'अल निनो'च्या 25 वर्षांत 16 वेळा पाऊस चांगला झाला आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी काही उपग्रहीय प्रतिमा प्रसिद्ध केल्या. त्यात त्यांनी दावा केला आहे की, एकटा 'अल निनो' कमी पावसाला जबाबदार नाही, तर भारतीय समुद्री स्थिरांकासारखे इतर काही घटक देखील अनुकूल असतील. 'अल निनो' परिस्थिती असली तरी पाऊस चांगला पडतो. यंदा 'अल निनो'चे वर्ष असून, भारतीय समुद्री स्थिरांक जूनमध्ये तटस्थ होता. आता तो सकारात्मक होत आहे. त्यामुळे जुलैमध्ये पाऊस देशात सर्वत्र चांगला होईल. प्रामुख्याने राज्यात 106 टक्के पावसाचा अंदाज आहे.

'अल निनो' जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आयओडी
1958 -14.6 12.6 26.2 37.6 निगेटिव्ह
1965 -30.1 -4 -24.6 -22.5 निगेटिव्ह
1972 -26.2 -27.2 -13.8 -23.2 सकारात्मक
1982 -17.4 17.8 8.3 -24.2 सकारात्मक
1987 -21.1 -21.5 -4.6 -10.3 सकारात्मक
2009 -47.1 1.9 -24.1 -15.2 सकारात्मक

जून 2023 : देशाच्या विविध भागांत झालेला पाऊस

विभाग प्रत्यक्ष पडला दरवर्षी पडतो फरक
देशभरात 148.6 165.3 -10 %
उत्तर पश्चिम 111.1 78.1 42 %
पूर्वोत्तर भाग 269.9 328.4 -18 %
मध्य भारत 160.4 170.3 -6 %
दक्षिण भारत 88.6 161 -45 %

'अल निनो' जूनपासूनच सकारात्मक आहे. त्याचा स्कोअर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये वाढतोय. मात्र, भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मकतेकडे जात आहे. त्यामुळे जुलैमध्ये पाऊस वाढणार आहे. जूनमध्ये पाऊस कमी होण्याचे मुख्य कारण बिपरजॉय चक्रीवादळ होते. मात्र, या वादळाने गुजरात व राजस्थानात विक्रमी पाऊस झाला.
                                – डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, आयएमडी, दिल्ली

असा वाढतोय 'अल निनो'चा स्कोअर
जुलै 2023 ः 0.81 ऑगस्ट 2023 ः 1.35 सप्टेंबर 2023 : 1.94 ऑक्टोबर 2023 : 2.32 नोव्हेंबर 2023 : 2.28

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT