आजपासून तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता

file photo
file photo

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात बुधवार ते शुक्रवार (5 ते 7 जुलै) दरम्यान अतिवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सर्वच बाजूंनी मान्सूनचा वेग वाढल्याने संपूर्ण देशातच या तीन दिवसांत अतिवृष्टीची शक्यता आहे.

मान्सूनचा वेग बंगालच्या उपसागरासह दिल्लीसह आसपासच्या भागांत जोरदार वाढत आहे. गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र व गुजरात या चारही राज्यांच्या किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आणि बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनला पोषक वातावरण मिळाल्याने 5 ते 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news