Latest

Google च्‍या AI Bard ने दिले चुकीचे उत्तर, कंपनीला झालं १०० अब्‍ज डॉलरचे नुकसान, जाणून घ्‍या काय आहे प्रकरण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Google च्‍या AI Bard ने दिले चुकीचे उत्तर दिले आणि गूगलची सहयोगी कंपनी अल्‍फाबेटच्‍या शेअर्समध्‍ये बुधवारी ( दि. ८ ) ८ टक्‍के घसरण झाली. यामुळे कंपनीचे तब्‍बल १०० अब्‍ज डॉलरचे नुकसान झाले आहे. जाणून घेवूया नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी…

नेमकं काय घडलं ?

ChatGPT ला टक्‍कर देण्‍यासाठी गूगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित चॅटबॉट बार्ड सेवा सुरु करणार आहे. मागील काही वर्ष कंपनी यावर काम करत होती. चॅटबॉटचा प्रसिध्दी कार्यक्रमावेळी एका वापरकर्त्याने प्रश्‍न विचारला. प्रश्‍न असा होता की, 'मी माझ्या 9 वर्षांच्या मुलास जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधील कोणत्या नवीन शोधांबद्दल सांगू शकतो? यावर चॅटबॉट बार्डने उत्तर दिले की,  जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आपल्या सौरमालेबाहेरील ग्रहाची पहिली छायाचित्रे घेतली. हे उत्तर चुकीचे होते. वास्तविक नासाच्या नोंदीनुसार या एक्सोप्लॅनेटची पहिली छायाचित्रे युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या व्हेरी लार्ज टेलिस्कोपने घेतली होती.

चुकीच्या उत्तराचा कंपनीला मोठा फटका

प्रसिध्दी कार्यक्रमातील एका चुकीच्या उत्तराचा मोठा फटका कंपनीला बसला. बुधवारी अमेरिकेच्‍य शेअर बाजारात अल्‍फाबेटचे शेअर्समध्‍ये मोठी घसरण दिसून आली. एका रिपोर्टनुसार, बार्ड लाँच केल्‍यानंतर गुगलच्‍या मूळ कंपनीला तब्‍बल १०० अब्‍च डॉलरचे ( सुमारे ८,२५० अब्‍ज रुपये ) नुकसान झाले आहे. कंपनीचे बाजार मूल्‍य १०० अब्‍ज डॉलरने कमी झाले आहे. Google शेअर्स 8.1% घसरून 98.91 वर आले.

अल्‍पावधीत चॅटबॉटने मिळवलीय लक्षणीय लोकप्रियता

ChatGPT ओपन एआयने विकसित केले आहे. हा एक संभाषणात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबॉट आहे. म्हणजेच हा चॅटबॉट संवादात्मक पद्धतीने तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो. गेल्या काही काळामध्ये या चॅटबॉटने खूप लोकप्रियता मिळवली आहे. याचा पाश्‍र्वभूमीवर ChatGPT ला टक्‍कर देण्‍यासाठी गूगल ने एआय आधारित चॅटबॉट बार्ड सेवा सुरु करणार असल्‍याचे जाहीर केले होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT