Stock Market : शेअर बाजाराचा आजचा दिवस संघर्षमय, जाणून घ्या कोणते शेअर्स राहिले तेजीत | पुढारी

Stock Market : शेअर बाजाराचा आजचा दिवस संघर्षमय, जाणून घ्या कोणते शेअर्स राहिले तेजीत

पुढारी ऑनलाइन डेस्क : आजच्या भारतीय बाजारात बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक आणि इन्फोसिस हे सेन्सेक्सवर सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या ठरल्या. याशिवाय पे टीएम , झोमॅटो, रिलायन्स यांचे शेअर्स आज दुस-या दिवशीही तेजीत होते. तर मारुती, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये आजही घसरण दिसून आली. गेल्या 4 दिवसांपासून चांगली कामगिरी करणा-या अदानी समूहाच्या अदानी विलिमर्स सोडून अन्य सर्व कंपन्यांचे शेअर्स आज मोठ्या प्रमाणात घसरले दुपारच्या सत्रापर्यंत अदानी एंटरप्रायजेसचा स्टॉक 20 टक्क्यांनी घसरला. अदानी विल्मर्स मात्र 5 टक्क्यांनी वधारले. बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स या ट्विन्सचे आजच्या बाजारात सर्वात मोठे योगदान ठरले. बाजार बंद होताना सेन्सेक्स 100 अंकांनी वर आला तर निफ्टी 17900 च्या घरात पोहोचला.

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज नकारात्मक लाल रंगात झाली. BSE सेन्सेक्स 39.34 पॉइंट्स किंवा 0.06% घसरून 60,624.45 वर आणि NSE निफ्टी 50 34.30 पॉइंट्स किंवा 0.19% घसरून 17,837.40 वर आला. बाजाराच्या सुरुवातीला निफ्टी 17850 च्या खाली घसरला, सेन्सेक्स 120 अंकांनी घसरला; बँक निफ्टी 50 अंकांनी खाली, अदानी Ent चे शेअर 7% टक्क्यांनी घसरले.

काल बुधवारी दिवसभर बाजाराचा आलेख उंचावल्यानंतर आज गुरुवारी मात्र, देशांतर्गत इक्विटी निर्देशांक लाल दिव्यांनी उघडले. BSE सेन्सेक्स 39.34 पॉइंट्स किंवा 0.06% घसरून 60,624.45 वर आणि NSE निफ्टी 50 34.30 पॉइंट्स किंवा 0.19% घसरून 17,837.40 वर आला.

नंतरच्या सत्रात हळू-हळू बाजार सावरला. सेन्सेक्स स्थिर झाला. तर निफ्टीने पुन्हा एकदा रिकव्हर करत 17850 ची पातळी गाठली. सकाळच्या सत्रात नकारात्मक सुरुवात करणा-या पे टीएमचे शेअर्स बाजार स्थिरावल्यावर वधारले. पेटीएमचे शेअर्स साडेअकराच्या सुमारास 30.30 अंकांनी वर येऊन सलग चौथ्या सत्रापर्यंत वधारले.

बाजार बंद होताना सेन्सेक्स 100 अंकांपर्यंत तर निफ्टी 17900 अंकांच्या घरात पोहोचला

बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली असली तरी नंतर बाजार हळूहळू सावरला. निफ्टी रिकव्हर करत 17,900 अंकात पोहोचला तर सेन्सेक्स 150 अंकांपर्यंत वर आला. मात्र, बँक निफ्टी शेवटच्या सत्रातही 50 अंकांनी खाली आला होता.

Back to top button