पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरूच आहेत. परंतु महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी दिल्लीत आवाज उठवला पाहिजे, असे मत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (दि.१८) व्यक्त केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत एकमताने आवाज उठवावा, यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक बोलावली होती.
दरम्यान, संसदेतही मराठा आरक्षण प्रश्नावर राज्यातील काही खासदारांनी प्रश्न मांडला आहे. राज्य विधिमंडळात मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी बोलावलेली बैठक दिल्लीत होत आहे. त्यामुळे भाजपचे किती खासदार या बैठकीला उपस्थित राहतात किंवा त्यांची भूमिका काय असेल, हेही पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
हेही वाचा