Latest

Alia Bhatt : आलियाने शेअर केला गरोदरपणातील बेबी कीकचा अनुभव

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया भट्ट ही तिच्या गरोदरपणाच्या त्या दिवसात खूप खूश होती. खरतर ती सध्या तिचा नवा चित्रपट ब्रम्हास्त्रच्या यशामुळे खूप आनंदी आहे. तसेच गरोदर महिलांना आराम करावा लागतो, पण ती सध्या हे सर्व बाजूला ठेवून तब्येतीची काळजी घेत ब्रह्मास्त्र सिनेमाासाठी काम करत आहे. नुकतीच ती तीच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसून आली. तीला सिंगापूरमध्ये 'टाइम 100 इम्पॅक्ट' पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या आलियाने आपल्या भाषणातून तिच्यातील उणिवाबाबत खुलासा केला. यादरम्यान त्याने आपल्या तिच्या बाळाच्या गोंडस कृतीही चाहत्यांशी शेअर केल्या.

ती चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कसा विचार करत होती आणि आता ती कशी आहे, याबाबत तिने बोलताना सांगितले. तीने सांगितल्यानूसार, 'जेव्हा तिने काम करायला सुरुवात केली, तेव्हा तीला असे वाटायचे की, एक दिवस ती जगावर राज्य करेल. ती असंही म्हणाली की, प्रत्येकाची अशी समजूत असते की, मी कोण आहे आणि मी किती मेहनती, हुशार, तेजस्वी आणि परिपूर्ण आहे. तसेच मला देखील परिपूर्ण व्हायचे होते आणि जगालाही दाखवून द्यायचे आहे की मी कीती तेजस्वी आहे.

यादरम्यान आलिया भट्टने तिच्या बाळाबद्दल देखील एक गोष्ट सांगितली. टाईम 100 हा अवॉर्ड मिळाल्याने आलिया खूप खूश दिसत होती. याबद्दल तीने त्याचे चाहते, कुटुंब आणि टीमचे आभार मानले. आलियाने सांगितले की, हा पुरस्कार केवळ तिच्यासाठीच खास नाही, तर या कामगिरीचा तिच्या मुलावरही परिणाम होईल. या संपूर्ण भाषणात माझ्या पोटात लाथ मारणाऱ्या या पुरस्काराचा माझ्यावर आणि माझ्या मुलावर परिणाम झाला आहे, असे ती म्हणाली.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी एप्रिल महिन्यात विवाहबद्ध झाले आणि आता ती एका मुलाची आई होणार आहे. यावर्षी तिने गंगूबाई काठियावाडी, आरआरआर, डार्लिंग आणि ब्रह्मास्त्र रिलीज केले आहेत. सर्वच चित्रपटांसाठी आलियाचे खूप कौतुक झाले आहे. ब्रह्मास्त्रानंतर ही अभिनेत्री रणवीर सिंगसोबत रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरीमध्येही दिसणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT