Latest

Ramsetu : दिवाळीत प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा रामसेतू

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतूची मोठी उत्सुकता असून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाची पहिली झलक २६ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पाहण्यास मिळाली. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी कू ॲपवर याबाबतची माहिती दिली आहे.

प्राईम व्हिडिओज हा या चित्रपटाचा डिजिटल पार्टनर आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर बघायला मिळेल. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटानंतर अक्षय कुमारचा इम्रान हाश्मी सोबतचा, "सेल्फी" हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर अक्षय कुमारचा अभिनेत्री राधिका मदानसोबत चित्रपट येणार असून या चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर करण्यात आले नाही.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT