Latest

Akhtar on Virat : विराट-अनुष्काचे शोएब अख्तरने केले कौतुक; म्हणाला, “विराटची पत्नी म्हणजे ‘आयर्न लेडी’ तर विराट”

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने अफगानिस्तानविरूद्धच्या सामन्यात अडीच वर्षांनंतर शतक झळकावले. यानंतर जगभरातून विराट कोहलीच्या या शतकाबाबत चर्चा होत आहे. दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहली आणि त्याची  पत्नी अनुष्का शर्माचे कौतुक केले आहे. शोएब अख्तरच्या या वक्तव्यामुळे भारतीय चाहत्यांची मने त्याने जिंकली आहेत. (Akhtar on Virat)

शोएब अख्तर एका युट्यूब चॅनेलवर विराटचे कौतुक करताना म्हणाला की, विराट कोहली महान फलंदाजांपैकी एक आहे. यामध्ये कोणतीही शंका नाही. ज्यापद्धतीने त्याने ७१ वे शतक पूर्ण केले ते कौतुकास्पद आहे. विराट कोहलीला शतकांचे शतकही पूर्ण करायचे आहे. त्यासाठी उर्वरित २९ शतक तो नक्कीच झळकावेल. विराट कोहलीकडे शतकांचे शतक करण्याची क्षमता आहे. तो ही कामगिरी नक्की करेल, असेही शोएब अख्तर यावेळी म्हणाला. दरम्यान, शोएबने विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माचेही कौतुक केले आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही 'आयर्न लेडी' आहे. तर विराट कोहली हा स्टील बॉडी असलेला खेळाडू असल्याचे शोएब अख्तर म्हणाला आहे. (Akhtar on Virat)

नोव्हेंबर २०१९ पासून विराट कोहलीला एकही शतक झळकवता आले नव्हते. गेल्या अडीच वर्षांपासून तो त्याच्या खराब फॉर्मशी झुंज देत होता. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्यांच्यावर अनेकांकडून टीकाही करण्यात येत होती. कोहलीने गुरूवारी आशिया चषक स्पर्धेत सुपर ४ मधील अफगानिस्तानविरूद्धच्या सामन्यात १२२ धावांची दमदार खेळी केली. जवळपास १०२० दिवसानंतर विराटने शतकी खेळी केली. आशिया चषक स्पर्धेतून भारत बाहेर पडला असला तरी विराट कोहली पुन्हा फॉर्मात येणे ही भारतीय संघासाठी महत्वाची बाब आहे. (Akhtar on Virat)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT