Latest

Ajit Pawar Latest News : शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर बोलण्यास प्रफुल्ल पटेलांचा नकार

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ajit Pawar Latest News : पक्षाने मला जे काही दिले त्यासाठी मी सदैव आभारी आहे, आज जो निर्णय घेतला तो अजित पवारांनी घेतला आहे. त्यामुळे माझ्या निर्णयाकडे मी पक्षाचाच निर्णय म्हणून पाहतो. पक्ष म्हणून निर्णय घेतला त्यात सर्वांचा समावेश होतो. आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून निर्णय घेतला आहे. हा फुटीरतावादी गट नाही. पक्ष अजूनही एकसंध आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिक्रियेवर बोलण्यास नकार दिला आहे.

महाराष्ट्रातील सत्तानाट्यात आज एक नवीन अंक जोडला गेला आहे. अजित पवार यांनी बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 35-40 आमदारांसह सामील झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यांनी यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. Ajit Pawar Latest News

Ajit Pawar Latest News : प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार – शरद पवार

अजित पवारांच्या बंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याचे आपल्याला माहित नाही, असे म्हटले. तसेच मी न्यायालयात नाही तर जनतेत जाणार. कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार. त्यानंतर मी संघटना बांधणीसाठी सुरुवात करेन. आपल्याला हे सर्व नवीन नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

त्याच वेळी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार असेही ते म्हणाले. आपण पक्षात प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांना काही जबाबदारी दिली होती. मात्र, त्यांनी त्यांची जबाबदारी योग्य रितीने पार पाडली नाही. प्रत्येक पक्षाची शिस्त असते, नियम असतात. त्यामुळे त्यांच्यावर उचित कारवाई करणार, असे ते त्यांनी म्हटले होते. Ajit Pawar Latest News

शरद पवार माझ्यासाठी कायम सन्माननीय – प्रफुल्ल पटेल

शरद पवार हे आमच्यासाठी कायम सन्माननीय होते आहेत आणि राहतील. त्यांनी आम्हाल खूप काही दिले आहे. त्यामुळे मी त्यांच्या प्रतिक्रियेवर काहीही बोलणार नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT