Latest

Sharad pawar V/S Ajit pawar : शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील VSI च्या बैठकीस अजित पवार अनुपस्थित 

अमृता चौगुले
पुणे; पुढारी वृत्तसेवा : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (VSI) संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.१५) सकाळी साडे वाजता सुरू झालेल्या बैठकीस उपस्थित राहण्याचे व्हीएसआयचे संचालक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाळले. मात्र, व्हीएसआयचे  उपाध्यक्ष आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित आहेत.
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,  राजेश टोपे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे व अन्य मान्यवर उपस्थित आहेत.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT