Latest

Air pollution in Delhi : दिल्लीच्या वायू प्रदूषणावर आनंद महिंद्रांनी सांगितला उपाय, पाहा व्हिडिओ

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या वायू प्रदूषणाची गंभीर समस्या आहे. शेतातील काडीकचरा जाळल्याने या प्रदुषणात वाढ होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमधून त्यांनी दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी काडीकचरा जाळण्यासाठी पर्यायी उपाय असल्याची माहिती दिली आहे. (Air pollution in Delhi)

महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. दिल्लीतील प्रदुषणाचा सध्याचा गंभीर विषय आहे. या प्रदुषणावर त्यांनी काही मार्ग सुचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शेतीच्या काडीकचरा व्यवस्थापनाबाबत त्यांनी माहिती दिली आहे. (Air pollution in Delhi)

आनंद महिंद्रा यांची दिल्ली प्रदुषणावरील उपायांबाबत पोस्ट

आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, "दिल्लीचे प्रदूषण दूर करण्यासाठी, पुनरुत्पादक शेतीला संधी द्यायला हवी. मातीची उत्पादकता वाढवताना काडीकचरा जाळण्यासाठी काही उपाय आहेत. असे म्हणत एक व्हिडिओ महिंद्रा यांनी शेअर केला आहे. यामध्ये शेतीच्या काडीकचऱ्याचे व्यवस्थापन कसे केले जाऊ शकते याची माहिती दिली आहे.ॉ

हेही वाचा

SCROLL FOR NEXT