Latest

Delhi Pollution: दिल्लीत पुन्हा वायू प्रदूषणाचे संकट! वायु गुणवत्ता निर्देशांक ३२९ च्या घरात

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: राजधानी साधारणत: दिवाळी अथवा गहू कापणीनंतर प्रदूषणाची समस्या भेडसावते. परंतु, यंदा फेब्रुवारी महिन्यात देखील दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात प्रदूषणामुळे वायू गुणवत्ता निर्देशांक खालावला आहे. वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) त्यामुळे तात्काळ प्रभावाने ग्रेडेड रिस्पांस एक्शन प्लॉनचा (जीआरएपी) दुसरा टप्पा लागू केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत आज (दि.१७) सकाळी सरासरी वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अत्यंत खराब श्रेणीत ३२९ नोंदवला. तर शहरातील प्रमुख केंद्रांवर एक्यूआय अत्यंत खराब श्रेणीत (Delhi Pollution)  नोंदवण्यात आला.

एनसीआरमधील नोएडात एक्यूआय ३६६ तर गुरूग्राममध्ये एक्यूआय ३२२ नोंदवण्यात आला. राजधानीतील तापतानात वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी कमाल तापमान १२.८ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. सामान्य तापमानाच्या तुलनेत हे दोन अंश सेल्सियसने अधिक आहे. गुरूवारी कमाल तापमान १०.५ अंश सेल्सियस तर किमान तापमान २८.७ अंश सेल्सियस नोंदवण्यात (Delhi Pollution)  आले होते.

प्रदूषणावर आळा घालण्यासाठी जीआरपी-२ नुसार रस्त्यावर सफाईसाठी मशिनचा वापर केला जातो. प्रमुख रस्ते तसेच वर्दळीच्या मार्गावर धूळ उडू नये, म्हणून पाण्याचा वापर केला जातो. बांधकाम सुरू असलेल्या तसेच तोडफोड सुरु असलेल्या परिसरात धूळ उडू नये, यासाठी खास व्यवस्थापन केले जाते. हॉटेल तसेच ढाब्यांवर सुरू असलेल्या तंदुरी भट्टीत कोळसा तसेच लाकडांचा वापर बंद करण्याचे निर्देश दिले जातात. आवश्यक सेवा सोडून इतर कुठल्याही ठिकाणी डिझेलवर चालणाऱ्या सयंत्रांवर बंदी घातली जाते. तसेच खासगी वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पार्किंग स्थळांचे शुल्क वाढवले जाते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT