Latest

Indian Navy : नौदलाच्या अग्नीपथ योजनेत महिलांना 20 टक्के प्रतिनिधत्व दिले जाणार

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
युवकांना लष्करी सेवेत सामावून घेण्यासाठीची अग्नीपथ योजना अलीकडेच कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यानुसार नौदलात भरती
( Indian Navy )  होणाऱ्यांपैकी 20 टक्के प्रतिनिधीत्व महिलांना दिले जाणार असल्याचे नौदल सूत्रांकडून आज सांगण्यात आले.

सरकारकडून अग्निपथ योजना जाहीर करण्यात आल्यानंतर त्याला बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगण आदी राज्यात तीव्र विरोध झाला होता. मात्र योजनेअंतर्गत आतापर्यंत लाखो युवकांनी अर्ज केले आहेत. नौदलाकडून अग्नीवीर भरतीची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली होती व त्यात महिलांना 20 टक्के प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. भरती झालेल्या अग्नीवीरांना नौदल संरक्षण सेवेसाठी विविध ठिकाणी पाठविले जाईल.

Indian Navy : आतापर्यंत 10 हजार युवतींनी केले अर्ज

नौदलातील अग्नीवीर भरतीसाठी आतापर्यंत 10 हजार युवतींनी अर्ज केले आहेत. नौदल भरतीसाठी पुरुष-महिला असा कोणताही भेदभाव केला जाणार नसून, उलट महिलांना 20 टक्के प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. भरतीनंतर महिलांना ज्या शाखेत सेवेसाठी पाठविले जाईल, त्यात ऑर्डीनन्स, इलेक्ट्रिकल, नेवल एअर मेकॅनिक्स, कम्युनिकेशन्स (ऑपरेशन), गनरी वेपन्स आदी शाखांचा समावेश आहे, असेही नौदलाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT