Latest

Sonakshi sinha relationship : रिलेशनशिपनंतर सोनाक्षीच्या नव्या फोटोची चर्चा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड जहीर इकबाल यांच्या गेल्या काही दिवसांपासून अफेअरच्या (Sonakshi sinha relationship) चर्चा रंगली आहे. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याचे नातं उघड केले आहे. यानंतर मात्र, सध्या सोनाक्षीच्या जहीर इकबालसोबतच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर बेस्ट फ्रेंड्सचे काही फोटो शेअर केले आहेत. यात फोटोत खास करून सोनाक्षीसोबत जहीर इकबाल ब्लॅक रंगाच्या टिशर्टमध्ये दिसत आहे. फोटोत सोनाक्षीची जवळची मैत्रीण हुमा कुरैशी देखील हटके अदांजात दिसतेय. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'नॅशनल बेस्ट फ्रेंड डे', या मित्रांना सांभाळण्याची माझी जबाबदारी असून त्याच्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. माझ्या जीवनात आनंद भरणारे हेच मित्र आहेत. असे लिहिले आहे. यावरून सोनाक्षीने फोटोतील सर्वाना 'बेस्ट फ्रेंड' म्हटले आहे.

याआधी सोनाक्षीने जहीर इकबालसोबतच्या ( sonakshi sinha relationship ) नात्यासंबधीत एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने 'हात धुवून माझ्या लग्नाच्या मागं का लागलात?, 'प्रपोजल, रोका, मेहंदी, संगीत सर्व फिक्स झाले की, कृपया मलाही सांगा.' असे म्हटलं होतं. याशिवाय सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जहीरने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टच्या कॉमेंन्ट सेक्शनमध्ये 'आय लव्ह यू' असे जहीरने लिहिले होते. यावर सोनाक्षीने रिप्लाय देताना "धन्यवाद…लव्ह यू…आता मी तुला मारायला येत आहे." असे म्हटलं होतं. यावरून दोघांच्यात अफेअर सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

यानंतर सोनाक्षी आणि जहीर यांच्या नाते अधिकृत झाल्याची घोषणा केली होती. मात्र, सध्या फोटोतील सर्वजण बेस्ट फ्रेंड असल्याचे म्हटल्याने चाहत्यांनी अनेक तर्क- वितर्क लावले आहेत. यात एका युजर्सने जहीरसोबत सोनाक्षाची अफेअर सुरू असताना तो बेस्ट फ्रेंड कशा बनतो? असा प्रश्न पडला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT