भारतीय क्रिकेट संघाला लवकरच नवीन कोच मिळणht आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी भारतीय संघाचा कोच म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे . पुढल्या दोन वर्षांसाठी द्रविड कोच म्हणून काम पाहतील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
उद्यापासून (दि.१७) टी-२० विश्वचषक (T-20 world cup) सूरू होणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रवी शास्त्री राजीनामा देणार आहेत . भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच म्हणून राहुल द्रविड आणि पारस महाम्ब्रे बॉलिंग कोच होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. सूत्राच्या माहितीनूसार राहुल द्रविडने कोच होण्यासाठी तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, बॉलिंग कोच म्हणून पारस महाब्म्रे तर बॅटींग कोच म्हणून विक्रम राठोड यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे युवा खेळाडुंना मोठा फायदा होणार आहे. भारतीय युवा टीममधील बऱ्यापैकी खेळाडुंनी राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात खेळ केला आहे.
जय शहा आणि सौरव गांगुली यांच्या सांगण्यावरून राहुल द्रविड भारतीय संघाचा कोच होण्यास तयार झाल्याचेही बोलले जात आहे.
राहुल द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी काम करत आहेत. भारतीय संघासाठी त्यांनी श्रीलंका दौऱ्यावेळी काम पाहिले आहे. द्रविडच्या नेतृत्वात १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही मिळते आहे.
यापूर्वीही द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती. आपण जे काम करतोय त्यामध्ये आपल्याला समाधान असल्याचेही द्रविडने सांगितले होते. तसेच मुख्य संघाला प्रशिक्षण देण्याऐवजी तरुण खेळाडूंना तयार करण्यासाठी क्रिकेट अकदामीमध्येच काम करायला आवडत असल्याचे तो म्हणाला होता.