Latest

Boycot Bollywood : लाल सिंह चड्ढा, लायगरनंतर हा चित्रपटदेखील बॉयकॉट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने होत आहे. (Boycot Bollywood) आतापर्यंत फक्त नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना विरोध होत होता. पण आता त्यात ७० च्या दशकातील चित्रपटांचीही नावे घेतली जात आहेत. या यादीत सुपरहिट चित्रपट 'शोले'चाही समावेश आहे. (Boycot Bollywood)

बॉलिवूड सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. एकीकडे चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाहीयेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. अलीकडे सोशल मीडियावर आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' आणि विजय देवरकोंडाच्या 'लायगर' विरोधात अशाच प्रकारच्या मोहिमा चालवल्या जात आहेत. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत. आता या यादीत दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा सर्वात हिट चित्रपट 'शोले'चाही समावेश झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावर टीका होत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही हँडल असे ट्विट करत आहेत आणि आरोप करत आहेत की, आत्ताच नाही तर ७०, ८० आणि ९० च्या दशकातही बॉलीवूड चित्रपटांमध्ये हिंदूंना वाईट म्हणून दाखवण्यात आले होते, तर मुस्लिमांची व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे दाखवण्यात आली होती. यासाठी लोक 'शोले' आणि 'सुहाग' या सुपरहिट चित्रपटांची उदाहरणे देत आहेत. हे दोन्ही चित्रपट त्यांच्या काळातील सुपरहिट चित्रपट होते. 'शोले' सलीम-जावेद जोडीने तर 'सुहाग' कादर खान यांनी लिहिला होता.

'शोले' आणि 'सुहाग'ला विरोध का?

ट्विटरवर काही लोक या दोन चित्रपटांची उदाहरणे देत म्हणतात की, शोलेमध्ये गावातील रहीम काका म्हणजेच इमाम साहिब खूप चांगला माणूस म्हणून दाखवण्यात आला होता. ही व्यक्तिरेखा ए के हंगल यांनी साकारली होती. तर 'सुहाग' चित्रपटात अमजद खान आणि इतर कलाकारांना साधूच्या वेशात दाखवण्यात आले आहे तर चित्रपटातील त्यांची पात्रे गुन्हेगारांची होती. म्हणजेच चित्रपटांतून एक प्रकारे साधूंचा अपमान करून त्यांना गुन्हेगार दाखवले जात होते.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बहिष्काराची मागणी

आता बॉलीवूड बहिष्काराच्या या ट्रेंडमध्ये कोणते चित्रपट ओढले जातात हे पाहावे लागेल. सध्या सोशल मीडियावरील परिस्थिती बॉलिवूड विरोधी असल्याचे दिसते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बहिष्कार टाकण्याची मागणी आता होत आहे. सोशल मीडियावर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटालाही लोक विरोध करत आहेत.

SCROLL FOR NEXT