Latest

Bobby Deol Upcoming Movie : ‘ॲनिमल’ नंतर बॉबी देओलकडे अनेक चित्रपटांची रांग

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल 'आश्रम' वेबसिरीज आणि 'ॲनिमल' चित्रपटाने खूपच चर्चेत आला होता. 'आश्रम' वेबसिरीजमधील बाबा निराला आणि 'अॅनिमल'मधील खलनायक अबरार हकची त्याने भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे बॉबीच्या अभिनय कारकिर्दीतील खूपच मोठे योगदान मिळालं. 'ॲनिमल' हा चित्रपट त्याच्या २८ वर्षांच्या कारकिर्दीतील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. ( Bobby Deol Upcoming Movie )

संबंधित बातम्या 

'ॲनिमल' या चित्रपटात बॉबीने एक छोटीशी नकारात्मक भूमिका साकारली होती. परंतु, कमी वेळ असूनही या भूमिकेला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटामुळे बॉबी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत परतल्याचे बोलले गेलं. या चित्रपटानंतर बॉबी देओलकडे बॉलिवूडसह टॉलिवूड आणि ओटीटीमधून आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची रांग लागली आहे. यामुळे जाणून घेवूयात बॉबी देओलकडील आगामी प्रोजेक्टस्… ( Bobby Deol Upcoming Movie )

ॲनिमल २

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्यासोबत 'ॲनिमल' चित्रपटात अभिनेता बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली. ही भूमिका पार कमी कालावधीची होती. मात्र, चाहत्यांची खूपच पसंतीस उतरली. याचदरम्यान 'ॲनिमल' च्या निर्मात्याकडे त्याचा सीक्वल बनवण्याची मागणी जोर धरू लागली. 'ॲनिमल' चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बॉबी भूमिका साकारत असून यापैक्षा ती अधिक शक्तीशाली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे लवकरच बॉबीचा आगामी 'ॲनिमल २' येणार असल्याचे समजते.

NBK 109

'NBK 109' हा एक तेलुगू चित्रपटात बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेते नंदामुरी बालकृष्ण यांचा हा १०९ वा चित्रपट आहे. चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरू झाले आहे.

कंगुवा

याशिवाय बॉबी देओल आगामी 'कंगुवा' या चित्रपटातून तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटातही बॉबी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात साऊथ स्टार सूर्या मुख्य भूमिकेत आहे. या भूमिकेबद्दल बोलताना बॉबीने म्हटलं होतं की, 'कधीही न पाहिलेला अवतार या चित्रपटात दिसणार आहे'. हा चित्रपट २०२४ च्या शेवटी प्रदर्शित होणार आहे.

स्टारडम

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. तो आगामी 'स्टारडम' नावाच्या वेबसीरिजवर काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'स्टारडम' वेबसीरिजमध्ये बॉबी देओलची भूमिका असणार आहे.

आश्रम ४

'आश्रम' या वेबसीरिजचे आतापर्यंत ३ सीझन आले आहेत आणि आता चौथा सीझन २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. या वेबसीरिजमध्ये बॉबीच्या बाबा निराला या व्यक्तिरेखेला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. यामुळे 'आश्रम ४' मध्येही बॉबी तीच भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. 'ॲनिमल' चित्रपटानंतर बॉबी देओलकडे यासारख्या अनेक चित्रपटाची रांग लागली आहे. बॉबीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते मात्र, उत्साही आहेत.

SCROLL FOR NEXT