Latest

Aditya-L1 Mission Updates:आदित्य-L1 सुस्थितीत; इस्रोची मोठी अपडेट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताची सूर्यमोहिम आदित्य-L1 संदर्भातील भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज मोठी अपडेट दिली आहे. आदित्य-L1 हे सुस्थितीत असल्याचे इस्रोने म्हटले आहे. दरम्यान आदित्य-L1 अंतराळयानाचा सूर्य-पृथ्वीमध्ये असलेल्या लॅग्रेंजन पॉइंट-१ (L) कडे यशस्वी मार्गक्रमण सुरू असल्याची माहिती इस्रोने त्याच्या X अकाऊंटवरू दिली आहे. (Aditya-L1 Mission Updates)

इस्रोने केलेल्यापोस्टमध्ये म्हटले आहे की,  ट्रान्झिस्टर करेक्शन मॅन्युव्हर (TCM) ही प्रक्रिया शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी अंदाजे १६ सेकंदांसाठी पार पाडली. TCM ही प्रक्रिया अंतराळयान L1 च्या आसपासच्या प्रभामंडल कक्षेत प्रवेश करण्याचा त्याच्या मार्गावर सुव्यस्थितरित्या असल्याचे स्पष्ट करते. यानुसार, 'आदित्य-L1' पुढे व्यवस्थित जात असल्याने काही दिवसांत मॅग्नेटोमीटर पुन्हा कार्यान्वित होईल, असेही इस्रोने म्हटले आहे. 19 सप्टेंबर 2023 रोजी पार पडलेल्या ट्रान्स-लॅग्रेंजन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) युक्तीचा मागोवा घेतल्यानंतर मूल्यमापन केलेले मार्ग दुरुस्त करणे आवश्यक होते.

चांद्रयान ३ च्या यशानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( Indian Space Research Organisation-ISRO) आता सूर्यमोहिमेच्या यशासाठी सज्ज आहे. आदित्य L1 (Aditya L1 Mission) या मोहिमेचे प्रक्षेपण २ सप्टेंबर रोजी झाले. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेल्या लॅगरेंज पॉईंटला पोहोचण्यासाठी या स्पेसक्राफ्टला १२५ दिवस लागणार आहेत. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असलेल्या लॅगरेंज पॉईंट १ येथे हे स्पेसक्राफ्ट स्थिरावणार आहे. या  लक्ष्याकडे आदित्य-L1 ची सुस्थितीत वाटचाल सुरू आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

Aditya-L1 Mission Updates: क्रोमोस्पेअरचा अभ्यास

सूर्याचा अगदी वरच्या भागाचा त्याशिवाय क्रोमोस्पेअर, आणि कोरोना यांचा अभ्यास 'आदित्य-एल१' करणार आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणाला कोरोना असे म्हटले जाते. तर सूर्याचा जो दृश्य भाग आहे, त्याला फोटोस्फेअर (photosphere) म्हटले जाते. फोटोस्पेअर आणि कोरोना (Corona) यांच्यामध्ये प्लाज्माचा थर आहे, याला क्रोमोस्फेअर (chromosphere) म्हटले जाते. याला प्लाज्माचे फिजिक्स, सौर-वादळे, कोरोनल मास इजेक्शन यांचा अभ्यास आदित्य L1 करणार आहे. (ISRO study in Aditya-L1 mission) या स्पेसक्राफ्टच्या प्लेलोडवर सूर्याच्या पृष्ठभागावरील पार्टिकल (कण) आणि प्लाज्मा वातावरण यांचा नैसर्गिक स्थितीत अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा कोरोना भागाचे फिजिक्स आणि हा कोरोना कशा प्रकारे तप्त होतो, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास केला जाणार आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT