Latest

Aditya L1 Mission : आदित्य L1 ची कक्षा पाचव्यांदा यशस्वीरित्या बदलली; यान आता L1 बिंदूच्या मार्गावर; इस्रोची मोठी अपडेट

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Aditya L1 Mission : भारताच्या पहिल्या सौर मोहिमेअंतर्गत प्रक्षेपण केलेले आदित्य L1 या अंतराळयानाची पाचवी आणि अंतिम कक्षा यशस्वीरित्या बदलण्यात आली आहे. आता हे यान L1 बिंदुच्या दिशेच्या मार्गावर आहे. इस्रोने 'X' वर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. इस्रोने म्हटले आहे की, आदित्य L1 ची पाचवी आणि अंतिम कक्षा यशस्वी रित्या बदलण्यात आली आहे. यापूर्वी 4 वेळा ही कक्षा बदलण्यात आली आहे.

Aditya L1 Mission : 110 दिवसांनी लँग्रेज बिंदूच्या कक्षेत पोहोचवणार

इस्रोने आपल्या ट्विटमध्ये आदित्य L1 मिशन विषयी म्हटले आहे की आदित्य L1 आता सूर्य आणि पृथ्वीच्या मधील लँग्रेज बिंदूच्या मार्गावर आहे. ट्रान्स-लॅग्रेंजन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) अर्थात कक्षा बदलण्याची क्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. अंतराळयान आता सूर्य-पृथ्वी L1 बिंदूवर जाणाऱ्या मार्गावर आहे. सुमारे 110 दिवसांनंतर यानाला अशाच युक्तीद्वारे L1 च्या भोवतालच्या कक्षेत स्थापित केले जाईल.

ही सलग पाचवी वेळ आहे की इस्रोने एखाद्या प्रक्षेपण मार्गावर एखादी वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तू किंवा अवकाशातील स्थानाकडे हस्तांतरित केली आहे.

प्रक्षेपणानंतर आतापर्यंतचा प्रवास

भारतीय अंतराळ संस्था ISRO ने 2 सप्टेंबर रोजी भारताचे पहिले सौर मिशन आदित्य-L1 प्रक्षेपित केले. ISRO ने PSLV C57 प्रक्षेपण वाहनातून आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण झाले.

3 सप्टेंबर रोजी आदित्य L1 ने प्रथमच कक्षा यशस्वीरित्या बदलली. ISRO ने सकाळी 11.45 वाजता माहिती दिली होती.

5 सप्टेंबर रोजी इस्रोने दुसऱ्यांदा कक्षा बदलली होती. इस्रोनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. (Aditya L1 Mission)

इस्रोने 10 सप्टेंबर रोजी पहाटे 2.30 वाजता तिसर्‍यांदा आदित्य एल1 अंतराळयानाची कक्षा बदलली. त्यानंतर ते पृथ्वीपासून २९६ किमी x ७१,७६७ किमीच्या कक्षेत पाठवण्यात आले.

आदित्य-L1ने 15 सप्टेंबर दुपारी 2.00 वाजता चौथ्यांदा कक्षा यशस्वीपणे बदलली होती.

त्यानंत आज 19 सप्टेंबरला पहाटे 2.00 वाजता आदित्य L1 ची कक्षा पाचव्या आणि अंतिम वेळा यशस्वीरित्या बदण्यात आली आहे.

Aditya-L1 कडून वैज्ञानिक डेटा गोळा करणे सुरु

आदित्य L1 ची पाचवी कक्षा बदलण्यापूर्वी इस्रोने मोठी अपडेट दिली. आदित्य L1 अंतराळ यानातील सुप्रा थर्मल अँड एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर (STEPS) उपकरण कार्यरत झाले आहे. यामध्ये सहा पेलोड (सेन्सर्स) असून, त्यातील सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) पेलोड हा कार्यान्वित झाले आहे. या सेन्सरने वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे, अशी पोस्ट इस्रोने 'X' वरून शेअर केली आहे. (Aditya-L1 Mission Updates)

Aditya L1 वरील पेलोड कॅमेऱ्यांकडून सेल्फी

दरम्यानच्या काळात, आदित्य L1 ने या प्रवासात सेल्फी काढला. याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या सेल्फीसह त्याने पृथ्वी आणि चंद्राच्या इमेजही कॅप्चर केल्या होत्या.

अनेक रहस्ये उलगडणार

सूर्य मोहिमेच्या माध्यमातून 'इस्रो' सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करणे 'इस्रो'ला शक्य होणार आहे. यासोबतच लॅग्रेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास 'आदित्य एल-1' करणार आहे. त्याखेरीज सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील, अशी अपेक्षा आहे. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल माहिती मिळेल. 'आदित्य एल-1'चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्‍या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT