Latest

Adipurush Controversy Dialogue : ‘आदिपुरुष’मध्ये ‘बजरंगबली’च्या तोंडून वदवली ‘बजरंग दल’ची भाषा; या राज्यात चित्रपटावर बंदी?

अमृता चौगुले

रायपूर; पुढारी ऑनलाईन : आदिपुरुष हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे, पण त्यासोबत वादाची मालिकाच घेऊन आला आहे. या चित्रपटात मर्यादा पुरुषोत्तम राम आणि रामायणाच्या मूळ भावनेची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटातील काही भाग काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या सगळ्या दरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यात चित्रपटावर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. यासोबतच आदिपुरुषमधील बजरंगबलीकडून बजरंग दलाची भाषा वदवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Adipurush Controversy Dialogue)

'आदिपुरुष' चित्रपटातून प्रभू राम आणि भगवान हनुमान यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शनिवारी (दि.१७ जून) केला. ते म्हणाले की, लोकांनी मागणी केल्यास काँग्रेस सरकार या चित्रपटावर राज्यात बंदी घालण्याचा विचार करू शकते. चित्रपटातील संवाद आक्षेपार्ह आणि असभ्य असल्याचा आरोप त्यांनी केला. (Adipurush Controversy Dialogue)

'प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न' (Adipurush Controversy Dialogue)

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, राज्य सरकार चित्रपटावर बंदी घालणार का ? असे पत्रकारांनी विचारले असता बघेल म्हणाले, "जर लोकांनी या दिशेने मागणी केली तर सरकार बंदी घालण्यावर विचार करेल. आम्ही पाहिले आहे. प्रभू राम आणि भगवान हनुमानाचे कोमल चेहरे भक्तीमध्ये भिनले होते, परंतु गेल्या काही वर्षांपासून ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

'राम आणि हनुमान ॲग्री बर्डच्या रुपात'

बघेल म्हणाले की, हनुमानाची ओळख लहानपणापासूनच शहाणपण, शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असल्याचे म्हणून सांगितले जाते, मात्र या चित्रपटात प्रभू राम चे योद्धा म्हणून दाखवले आहेत. राम आणि हनुमान ॲग्री बर्ड प्रमाणे चित्रित केले आहेत. हनुमानाच्या अशा प्रतिमेची आपल्या पूर्वजांनी कल्पनाही केली नव्हती किंवा आपला समाजही ती स्वीकारत नाही.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT