Latest

Parveen Babi Biopic :’बॉलिवूड अयशस्वी झाले पण…’; उर्वशी परवीन बाबीच्या बायोपिकमध्ये

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षापासून बायोपिक बनवण्याचा क्रेझ आहे. पडद्यावर एका महान व्यक्तिमत्त्वाची कथा चित्रित करण्यासाठी प्रत्येक अभिनेता उत्सुक असतो. यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, तापसी पन्नू हे स्टार्स अनेकांचे बायोपिक बनवण्यास तयारीला लागले आहेत. दरम्यान आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाही दिग्गज अभिनेत्री परवीन बाबी यांच्या बोयोपिकमध्ये ( Parveen Babi Biopic ) दिसणार आहे. याबाबतची माहिती उर्वशीने स्वत: पोस्ट शेअर करून दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री परवीन बाबी यांचा बायोपिक ( Parveen Babi Biopic ) मोठ्या पडद्यावर येणार असल्याची चर्चा अनेक दिवसापासून होती. दरम्यान उर्वशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याच्या बायोपिक घेवून येत असल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने 'बॉलिवूड अयशस्वी झाले पण मला परवीन बाबी यांचा अभिमान वाटेल. ओम नमः शिवाय. खरंच हा नवा प्रवास जादुई आहे. असे लिहिले आहे. याशिवाय तिने परवीन बाबी हे ठळक अक्षरात नमूद केलं आहे. यावरून उर्वशी रौतेलाला परवीन बाबीच्या बायोपिक घेवून येत असल्याची माहिती समोर आली आहे. या बायोपिक पाहण्यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

परवीन बाबी यांनी १९७२ साली मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली होती. तर फिल्मी करिअरची सुरुवात 'चरित्र' या चित्रपटातून केली. पडद्यावर त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रोफेशनल लाईफसोबत परवीन तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती. तिचे नाव अनेक स्टार्सशी जोडले गेले होते. २२ जानेवारी २००५ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूचे गुढ अद्याप कायम आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT