Latest

Sara Ali Khan : साराचा रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदा खुलासा, “खूपच वाईट …”

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ( Sara Ali Khan ) कमी कालावधीतच प्रकाश झोतात आली आहे. तिच्या पाच वर्षांच्या करिअरमध्ये अनेक दमदार चित्रपटात उत्तम अभिनय साकारला आहे. अभिनयासोबत सारा सोशल मीडियावरही सक्रीय असते. आता साराने नुकतेच एका शोमध्ये पहिल्यांदाच आपल्‍या रिलेशनशीपपबद्दलचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री सारा अली खानने ( Sara Ali Khan ) नुकतेच युट्युबवर रणवीर अल्लाबदियासोबत 'पॉडकास्ट' शोमध्ये रिलेशनशीपसह अनेक गोष्टीचा पहिल्यांदा खुलासा केला आहे. "२०२० हे वर्ष माझ्यासाठी खूपच वाईट होतं. या वर्षाची सुरुवात माझ्या ब्रेकअपने झाली आणि त्यानंतर माझे एकापेक्षा एक चित्रपट फ्लॉप होत गेले. 'लव्ह आज कल' चित्रपटातील अभिनय चाहत्यांना फारसा अवडला नाही. यामुळे थोडी निराशाजनक स्थिती निर्माण झाली. लोकांनी मला ट्रोलदेखील केले. यावेळी बराच वेळ सोशल मीडियावर घालवावा लागला. ट्रोलर्सना समोरच्याच्या मनस्थितीचा अंदाज नसतो. यामुळे ते काहीही बोलत असतात. ट्रोल करण्यासारखे काही केलेले असो वा नसो. यावेळी मला खूपच त्रासाला सामोरे जावे लागले. माझे हदय दुखावलं गेलं. पंरतु, याचा कोणालाही काहीही फरक पडत नाही."

सारा अली खानच्या करिअरच्या दृष्टीने २०२० वर्ष चांगले राहिले नाही. या काळात साराचे 'लव्ह आज कल' आणि 'कुली नंबर १' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. 'लव्ह आज कल' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा आणि कार्तिक आर्यन एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, दोघांनीही याबाबतची कोणतीच अधिकृत माहिती दिली नव्हती. यानंतर दोघांच्या ब्रेकअपचे वृत्त समोर आले होते. यानंतर साराचे नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडले गेले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सारा आगामी 'गॅसलाइट', 'ए वतन मेरे वतन', 'मर्डर मुबारक' चित्रपटासोबत जगन शक्ती आणि लक्ष्मण उत्रेकर यांच्या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT